Sunday, March 16, 2025 08:49:27 AM

महाराष्ट्रात सोयाबीन खरेदीला मुदत वाढ; 24 दिवसांची मदतवाढ देण्याचा केंद्राचा निर्णय

केंद्र सरकारने सोयाबीन खेरीदीला मुदत 24 दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

महाराष्ट्रात सोयाबीन खरेदीला मुदत वाढ 24 दिवसांची मदतवाढ देण्याचा केंद्राचा निर्णय

मुंबई : राज्यात यंदा सोयाबीनचे उत्पादन अधिक आलं आहे. सरकारने  6 फेब्रुवारी सोयाबीनच्या खरेदीची अंतिम  ठेवील होती. मात्र त्या मुदतीत शेतकऱ्यांच्या सोबाबीनची संपूर्ण खरेदी करणे शक्य न झाल्यामुळे शेतऱ्यांकडील सोयाबीन तसाच घरात पडून राहिला होता. यामुळे शेतकऱ्यांना खुल्या बाजारात सोयाबीन विकून तोटा सहन करावा लागत होता. त्यामुळे सरकारी खरेदी केंद्राना अधिकच मुदतवाढ देण्याची मागणी शेतकरी आणि नेत्यांनी केंद्र सरकारकडे केली होती. त्यानुसार केंद्र सरकारने सोयाबीन खेरीदीला मुदत 24 दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मुदतवाढ दिल्याने आता शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी आता खेरदी केंद्र तातडीने सुरू करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 

सोयाबीन उत्पादकांची चिंता 
यंदा सोयाबीनचे अधिक उत्पादन झाले आहे. निवडणुकीत भाजपकडून सोयाबीनचा दाणा-दाणा खरेदीचं आश्वासन देण्यात आले होते. मात्र, पहिल्या 12 जानेवारीपर्यंतच्या मुदतीत सोयबीनची अल्प खरेदी करण्यात आली. यानंतर 31 जानेवारीपर्यंत सोयाबीन खरेदीला केंद्राची मुदतवाढ देण्यात आली. यानंतर पुन्हा 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती. या मुदतीत 50 टक्केच सोयबीनची खरेदी शक्य झाली. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांकडे सोयाबीन पडून राहिला
उर्वरित सोयाबीन खरेदीसाठी मुदत वाढवण्याची मागणी केली. केंद्राकडून 24 दिवसांची सोयाबीन खरेदीची पुन्हा मुदतवाढ करण्यात आली. 

हेही वाचा : पालकमंत्रिपदावरुन शिवसेना - राष्ट्रवादीत वाढला दुरावा

शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात सोयाबीन उपलब्ध असल्याने त्यांच्याकडील मालाला योग्य भाव देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. महाराष्ट्र आणि अन्य राज्यातील सोयाबीन शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून केंद्र सरकारने याबाबत निर्णय घेत सोयाबीन खरेदीला मुदत वाढ दिली.

केंद्रीय कृषीमंत्र्यांचे निर्देश

2024-25 च्या खरीप हंगामासाठी सोयाबीन खरेदीस मुदतवाढ देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सोयाबीन खरेदीला 24 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. सरकारी खरेदी बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. 9 फेब्रुवारी 2025 पर्यंत 19.99 लाख मेट्रिक टन सोयाबीन खरेदी करण्यात आली. ग्राहक आणि उत्पादक शेतकऱ्यांना योग्यभाव मिळावा ही सरकारची भूमिका आहे. प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान योजनाही सुरू ठेवण्याचा निर्णय त्यांनी दिला आहे. 

हेही वाचा : ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ सुरु; पहिल्या टप्प्यात होणार राम जन्मभूमी अयोध्या दर्शन

सोयाबीन शेतकऱ्यांच्या मागणीनुसार केंद्राने मुदतवाढ दिली असली तरी राज्य सरकारने तातडीने खरेदी केंद्र सुरू केलेली नाहीत. ही खरेदी केंद्रे सुरू करून शेतकऱ्यांना लाभ द्यावा अशी मागणी करत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारला मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला. 

शेतकऱ्यांना आश्वासित केल्यानुसार सरकारने शेतकर्‍यांच्या उत्पादनाला योग्य हमीभाव द्यावा आणि दिलेल्या मुदतीतच उत्पादनांची खरेदी करावी आणि बळीराजावरील संकट दूर करण्याला प्राथमिकता देण्याची आवश्यकता आहे. 


सम्बन्धित सामग्री