Friday, April 25, 2025 08:16:13 PM

Amit Shah On Naxalism: 31 मार्च 2026 पर्यंत भारत नक्षलवादापासून मुक्त होईल; गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत दिलं आश्वासन

अमित शहा यांनी जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद, नक्षलवादी आव्हान, अंमली पदार्थांचे व्यसन आणि ईशान्येकडील समस्यांना तोंड देण्यासाठी सरकारने उचललेल्या पावलांवर चर्चा केली.

amit shah on naxalism 31 मार्च 2026 पर्यंत भारत नक्षलवादापासून मुक्त होईल गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत दिलं आश्वासन
Amit Shah On Naxalism
Edited Image

Amit Shah On Naxalism: गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी राज्यसभेत भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने अंतर्गत सुरक्षा मजबूत करण्यासाठी उचललेल्या पावलांची रूपरेषा सांगितली. '31 मार्च 2026 पर्यंत देशातून नक्षलवादाचे उच्चाटन केले जाईल,' असं आश्वासन अमित शहा यांनी यावेळी दिलं. राज्यसभेत त्यांच्या मंत्रालयाच्या कामकाजावरील चर्चेत अमित शहा यांनी जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद, नक्षलवादी आव्हान, अंमली पदार्थांचे व्यसन आणि ईशान्येकडील समस्यांना तोंड देण्यासाठी सरकारने उचललेल्या पावलांवर चर्चा केली.

2014 च्या आधीच्या अनेक समस्या आपल्याला वारशाने मिळाल्या - 

यावेळी बोलताना अमित शहा म्हणाले, 2014 मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आले तेव्हा 2014 च्या आधीच्या अनेक समस्या आपल्याला वारशाने मिळाल्या. तीन मुख्य मुद्द्यांमुळे या देशाची सुरक्षा आणि विकास नेहमीच आव्हानात्मक राहिला आहे. या तीन मुद्द्यांनी देशाची शांतता बिघडवली आहे, देशाच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले आहेत आणि जवळजवळ चार दशकांपासून देशाच्या विकासाच्या गतीला अडथळा आणला आहे. अनेक वेळा, या कारणांमुळे, देशाची संपूर्ण व्यवस्था देखील विनोदाचा विषय बनली. 

हेही वाचा - 2026 पूर्वी नक्षलवाद पूर्णपणे नष्ट करू; अमित शहा यांचे आश्वासन

मोदी सरकारने काश्मीरला भारताचा अविभाज्य भाग बनवले -  

दरम्यान, एका जुन्या घटनेची आठवण करून देताना अमित शहा म्हणाले की, एकेकाळी त्यांना लाल चौकात तिरंगा फडकवण्याची परवानगी नव्हती, परंतु भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर दरवर्षी लाल चौकात तिरंगा फडकवला जातो. काश्मीरमधून कलम 370  हटवण्याचा संदर्भ देत ते म्हणाले की, हा निर्णय व्होट बँकेसाठी नाही तर देशाच्या सुरक्षेसाठी आणि एकतेसाठी घेण्यात आला आहे. मोदी सरकारने काश्मीरला भारताचा अविभाज्य भाग बनवण्याचे काम केले आहे.

हेही वाचा - महाराष्ट्रात नक्षलवाद विरोधी कायदा होणार

गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून देशातील नक्षलवाद संपवण्याचे आश्वासन - 

राज्यसभेत बोलताना अमित शहा म्हणाले की, मी देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी तसेच सीमा मजबूत करण्यासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या हजारो राज्य पोलिस आणि केंद्रीय निमलष्करी दलाच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानतो. 31 मार्च 2026 रोजी देश नक्षलवादापासून मुक्त होईल. नक्षलवाद संपवणे आवश्यक असून आमचे सरकार ते एका वर्षाच्या आत संपवेल. सरकार नक्षलग्रस्त भागात विकास करत आहे, जेणेकरून तेथील लोक मुख्य प्रवाहात सामील होऊ शकतील. ईशान्येकडील समस्याही संपण्याच्या मार्गावर आहे, देशात हिंसक घटनांमध्ये 70 टक्के घट झाली आहे.

यावर्षी किती नक्षलवादी मारले गेले?

गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 2025 मध्ये आतापर्यंत 90 नक्षलवादी मारले गेले असून 104 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच 164 जणांनी आत्मसमर्पण केले आहे. तथापी, 2024 मध्ये 290 नक्षलवाद्यांना मारण्यात आले. तसेच 1090 जणांना अटक करण्यात आली आणि 881 जणांनी आत्मसमर्पण केले. याशिवाय मोदी सरकारच्या कार्यकाळात हिंसक घटनांची संख्या 53 टक्क्यांनी कमी होऊन 7744 झाली आहे. 
 


सम्बन्धित सामग्री