Sunday, August 17, 2025 05:13:58 PM

Jaguar Fighter Aircraft Crash: पंचकुलामध्ये भारतीय हवाई दलाचे जग्वार लढाऊ विमान कोसळले; पॅराशूटने उडी मारून वैमानिकाने वाचवले प्राण

विमान कोसळण्यापूर्वी, वैमानिकाने पॅराशूटने उडी मारून आपला जीव वाचवला. या अपघातात लढाऊ विमान पूर्णपणे जळाले होते.

jaguar fighter aircraft crash पंचकुलामध्ये भारतीय हवाई दलाचे जग्वार लढाऊ विमान कोसळले पॅराशूटने उडी मारून वैमानिकाने वाचवले प्राण
Jaguar Fighter Aircraft Crash
Edited Image, Twitter

Jaguar Fighter Aircraft Crash: हरियाणातील पंचकुलाच्या डोंगराळ भागात मोरनी येथील बलदवाला गावाजवळ हवाई दलाचे एक लढाऊ विमान कोसळले. विमान कोसळण्यापूर्वी, वैमानिकाने पॅराशूटने उडी मारून आपला जीव वाचवला. या अपघातात लढाऊ विमान पूर्णपणे जळाले होते. तसेच विमानाचे तुकडे परिसरात विखुरले होते. स्थानिक लोकांना लढाऊ विमान कोसळल्याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जंगलात जाऊन पायलटला वाचवण्याचा प्रयत्न केला. तथापि, विमान कोसळल्याची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले.

या घटनेबाबत भारतीय हवाई दलाने एक्सवर एक पोस्ट केली आहे. भारतीय हवाई दलाने ट्विटरवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'भारतीय हवाई दलाचे जग्वार विमान आज अंबाला येथे नियमित प्रशिक्षण उड्डाणादरम्यान सिस्टम बिघाडामुळे कोसळले. सुरक्षितपणे बाहेर पडण्यापूर्वी पायलटने विमानाला जमिनीवरील निवासी भागांपासून दूर नेले. अपघाताचे कारण शोधण्यासाठी भारतीय हवाई दलाने चौकशीचे आदेश दिले आहेत.' 

हेही वाचा - हल्लीच्या चोरांचा खरंच काही नेम नाही! कशाची चोरी केली.. केसांची.. तेही तब्बल एक कोटींच्या? विश्वासच बसत नाही

तांत्रिक बिघाडामुळे झाला अपघात - 

या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले आहे. तथापि, तांत्रिक बिघाडामुळे विमानाला अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, विमान झाडांवर आदळले आणि जंगलाच्या मध्यभागी असलेल्या एका खड्ड्यात पडले. विमान पडताच त्याला आग लागली आणि त्याचे अनेक तुकडे झाले. विमानाचे तुकडे आजूबाजूच्या परिसरात विखुरलेले आढळले.

हेही वाचा - दिल्लीत इमारतीवरून उडी मारून IFS अधिकारी जितेंद्र रावत यांची आत्महत्या; तपासादरम्यान समोर आली धक्कादायक बाब

पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल -  

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलिस आणि हवाई दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. प्राप्त माहितीनुसार, परिसर सील करण्यात आला असून घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. अपघाताच्या कारणांची चौकशी करण्यासाठी हवाई दलाने कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत.
 


सम्बन्धित सामग्री