नवी दिल्ली : भारतीय रेल्वे देशभरात 12 हजारांहून अधिक गाड्या चालवते. यापैकी फक्त एकच ट्रेन आहे, ज्यामध्ये प्रवाशांना फ्री जेवण (Free Food In This Train) दिले जाते.. तेही एकूण 6 स्टॉपेजवर.. आणि त्यात नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सर्व काही समाविष्ट आहे.
भारतीय रेल्वे दररोज सुमारे 2.5 कोटी लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाते. इतक्या मोठ्या संख्येने लोकांना नेण्यासाठी रेल्वेने एकूण 13,452 गाड्या तैनात केल्या आहेत. यामध्ये अनेक लक्झरी आणि सुपरफास्ट गाड्यांचाही समावेश आहे. पण सर्व गाड्यांमध्ये, फक्त एकच ट्रेन अशी आहे जिथे प्रवाशांना मोफत जेवण दिले जाते. याचा अर्थ असा की ही ट्रेन तुम्हाला प्रवासाचा आनंद तर देतेच, पण वाटेत मोफत नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण देखील देते.
हेही वाचा - धक्कादायक! विमानतळावर विमान सुखरूप उतरवलं...; पण थोड्याच वेळात वैमानिकाचा दुर्दैवी मृत्यू
रेल्वेची ही खास गाडी सर्वसामान्य लोकांसह मोठ्या संख्येने भाविकांना घेऊन प्रवास करते आणि देशातील दोन प्रसिद्ध धार्मिक स्थळांदरम्यान धावते. गेल्या 29 वर्षांपासून या ट्रेनमधील प्रवाशांना मोफत जेवण दिले जात आहे. तसं तर भारतीय रेल्वेत सर्वच लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये सर्व प्रवाशांना जेवण पुरवले जाते. परंतु, ही सुविधा सशुल्क आहे. म्हणजेच, यासाठी पैसे द्यावे लागतात. पण या एकमेव ट्रेनमध्ये मोफत नाश्ता आणि जेवण दिले जाते.
ही कोणती ट्रेन आहे आणि कुठून कुठे जाते?
ही ट्रेन महाराष्ट्रातील नांदेड शहर ते पंजाबमधील अमृतसर शहरादरम्यान धावते. ही ट्रेन अमृतसरमधील प्रमुख धार्मिक स्थळ श्री हरमंदिर साहिब गुरुद्वारा येथून सुरू होते आणि महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील श्री हजूर साहिब गुरुद्वाराला जाते. 1708 मध्ये नांदेडमध्येच शिखांचे 10 वे गुरु श्री गुरु गोविंदसिंहजी यांचे निधन झाले. ही ट्रेन या दोन धार्मिक स्थळांमधील प्रवास पूर्ण करते. या ट्रेनचे नाव सचखंड एक्सप्रेस (12715) आहे.
हेही वाचा - शाळेत घृणास्पद प्रकार; पिरीयडस आल्यामुळे परीक्षेवेळी विद्यार्थिनीला दिली अशी वागणूक
या 6 ठिकाणी जेवण दिले जाते
प्रवासादरम्यान, 6 थांब्यांवर लंगर आयोजित केला जातो. जिथे प्रवाशांना मोफत जेवण दिले जाते. हे थांबे नवी दिल्ली रेल्वे स्थानक, भोपाळ, परभणी, जालना, औरंगाबाद आणि मराठवाड्यातील आहेत.
2000 किलोमीटरचा प्रवास 33 तासांमध्ये
सचखंड एक्सप्रेस ट्रेन 2,000 किलोमीटर अंतर कापते आणि या प्रवासादरम्यान 39 स्थानकांवर थांबते. प्रवास पूर्ण करण्यासाठी ट्रेनला सुमारे 33 तास लागतात.
आहारात वेळोवेळी बदल केले जातात
या ट्रेनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण प्रवासात त्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जेवणासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत. नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण यांची संपूर्ण व्यवस्था मोफत आहे. वेळोवेळी अन्नातही बदल केले जातात. प्रवाशांना खिचडी, कढी-भात, डाळ, छोले, बटाटा-फुलकोबी अशी साधी पण चविष्ट भारतीय थाळी दिली जाते.
जेवणाचा खर्च कोणाकडून केला जातो?
या खाण्यापिण्याच्या सेवेचा खर्च प्रवाशांकडून आकारला जात नाही. या अन्न सेवेचा खर्च गुरुद्वारांमध्ये मिळालेल्या देणग्यांमधून केला जातो. मोफत लंगरचा आनंद घेण्यासाठी, या ट्रेनमधील सामान्य ते एसी बोगीतील प्रवासी त्यांच्यासोबत भांडी घेऊन जातात.