Sunday, August 17, 2025 05:15:01 PM

Navratna Company: मोदी सरकारचा मोठा निर्णय! IRCTC आणि IRFC ला मिळाला नवरत्न कंपनीचा दर्जा

इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) ही 25 वी आणि इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (IRFC) ही 26 वी नवरत्न कंपनी बनली आहे.

navratna company मोदी सरकारचा मोठा निर्णय irctc आणि irfc ला मिळाला नवरत्न कंपनीचा दर्जा
IRCTC And IRFC Become Navratna Companies
Edited Image

IRCTC And IRFC Become Navratna Companies: IRCTC आणि IRFC या दोन्ही कंपन्यांना नवरत्न दर्जा मिळाला आहे. त्याचा परिणाम आज कंपनीच्या शेअर्सवरही दिसून आला आहे. प्राप्त माहितीनुसार, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) ही 25 वी आणि इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (IRFC) ही 26 वी नवरत्न कंपनी बनली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबद्दल अभिनंदन केले आहे. नवरत्न दर्जा मिळाल्याने दोन्ही कंपन्यांना अधिक आर्थिक स्वायत्तता मिळते. आता या कंपन्या सरकारी मंजुरीशिवाय 1 हजार कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतील. यामुळे त्यांची निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. आयआरसीटीसी ही रेल्वे मंत्रालयाची एक सीपीएसई आहे ज्याची वार्षिक उलाढाल 4,270.18 कोटी, पीएटी 1,111.26 कोटी आणि निव्वळ संपत्ती 3,229.97 कोटी आहे. 

नवरत्न दर्जा मिळाल्यानंतर काय बदल होणार?

आयआरसीटीसी आणि आयआरएफसी यांना नवरत्नचा दर्जा मिळाल्याने आता कंपनीला गुंतवणुकीशी संबंधित निर्णय घेणे सोपे होईल. तसेच 1 हजार कोटी रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीसाठी सरकारची मंजुरी आवश्यक राहणार नाही. निव्वळ संपत्तीच्या 15 % पर्यंत गुंतवणूक करण्यासाठी देखील मंजुरी घेण्याची आवश्यकता नाही. परदेशात संयुक्त उपक्रम आणि उपकंपनी उघडण्यासाठी मान्यता दिली जाऊ शकते. 

हेही वाचा - IMF Prediction On Indian Economy: '2047 पर्यंत भारत बनू शकतो विकसित देश'; IMF ची मोठी भविष्यवाणी

कंपन्यांचे तीन गटांमध्ये वर्गीकरण - 

भारत सरकार कंपन्यांचे तीन गटांमध्ये वर्गीकरण करते.  महारत्न, नवरत्न आणि मिनीरत्न. सरकार कंपन्यांना त्यांच्या आर्थिक कामगिरी, व्यवस्थापन आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या आधारावर नवरत्न आणि महारत्न दर्जा देते. आयआरसीटीसी-आयआरएफसी कंपन्या आता भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, ऑइल इंडिया लिमिटेड आणि इतर नवरत्न सीपीएसईमध्ये सामील झाल्या आहेत.

हेही वाचा -  टॉप 24 सुपर अब्जाधीशांच्या यादीत अंबानी-अदानीचा समावेश; कोण आहे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती? जाणून घ्या

दरम्यान, सप्टेंबरच्या सुरुवातीला, सतलज जल विद्युत निगम लिमिटेड, राष्ट्रीय जलविद्युत महामंडळ, सौर ऊर्जा महामंडळ आणि रेलटेल कॉर्पोरेशन यांना 'नवरत्न' दर्जा देण्यात आला. तथापी, जुलै 2024 मध्ये, माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडला नवरत्न कंपन्यांच्या गटात समाविष्ट करण्यात आले.

Disclaimer: शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे. नियम व अटी काळजीपूर्वक वाचा. जय महाराष्ट्र कोणत्याही नफ्या-तोट्यास जबाबदार नाही. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या!


सम्बन्धित सामग्री