Thursday, July 17, 2025 02:49:42 AM

NEET MDS 2025: राज्य कोट्यात प्रवेशासाठी CET कडून अर्जप्रक्रिया सुरू

नीट MDS 2025 द्वारे राज्य कोट्यातील पदव्युत्तर दंत अभ्यासक्रमासाठी CET कडून ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांना ३ जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे

 neet mds 2025 राज्य कोट्यात प्रवेशासाठी cet कडून अर्जप्रक्रिया सुरू

मुंबई: राज्यातील सरकारी, खासगी आणि अल्पसंख्याक महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर दंत अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्याच्या इच्छुक विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची संधी चालून आली आहे. 'नीट एमडीएस 2025' परीक्षेच्या आधारे राज्य कोट्यातील जागांसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया CET कक्षाकडून सुरू करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांना 3 जुलै 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

या प्रक्रियेअंतर्गत, महाराष्ट्रातील सरकारी, महामंडळ, राज्य व केंद्र सरकारच्या अनुदानित, विनाअनुदानित खासगी तसेच अल्पसंख्याक महाविद्यालयांतील पदव्युत्तर दंत अभ्यासक्रमांसाठी पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणीसोबत शुल्क भरणे आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया देखील ३ जुलैपर्यंत पूर्ण करावी लागणार आहे.

हेही वाचा: Happy Doctor's Day 2025: आजचा दिवस डॉक्टरांसाठी; त्यांना पाठवा 'या' खास शुभेच्छा, संदेश आणि प्रेरणादायी विचार

महत्त्वाच्या तारखा पुढीलप्रमाणे:

ऑनलाइन नोंदणी व शुल्क भरणे: 3 जुलै 2025 पर्यंत

राज्य कोट्यांतर्गत जागांचा तपशील जाहीर: 3 जुलै

तात्पुरती गुणवत्ता यादी: 4 जुलै

पसंतीक्रम भरण्याचा कालावधी: 4 ते 6 जुलै

प्रथम फेरीसाठी गुणवत्ता यादी: 8 जुलै

महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेण्याची अंतिम मुदत: 9 ते 13 जुलै

या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थी mahacet.org या अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोंदणी करू शकतात.

विद्यार्थ्यांनी सर्व टप्पे काळजीपूर्वक पाळावेत, आवश्यक कागदपत्रे वेळेत अपलोड करावीत आणि दिलेल्या तारखांनुसार पसंतीक्रम नोंदवावा, असे आवाहन CET कक्षाकडून करण्यात आले आहे.
 


सम्बन्धित सामग्री