दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 6 जून 2025 रोजी सकाळी 11 वाजता माता वैष्णोदेवी क्रीडा संकुल, कटरा येथे जाहीर सभा होणार आहे. यासह, पंतप्रधान मोदींच्या हस्ते जगातील सर्वात उंच चिनाब पूलाचे उद्घाटन होणार आहे. यासोबतच इतर अनेक योजनांचेही उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार आहे. तसेच, माता वैष्णोदेवी कटरा येथून दोन वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्यात येईल. 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच जम्मू आणि काश्मीर दौरा आहे.
हेही वाचा: 'समृद्धी महामार्ग प्रकल्पात 15 हजार कोटींचा भ्रष्टाचार'; हर्षवर्धन सपकाळचे आव्हान
530 प्रवासी करू शकतील प्रवास:
कटरा येथे पोहोचल्यानंतर, प्रवाशांना सकाळी 8:10 वाजता वंदे भारत एक्सप्रेस मिळेल जी सकाळी 11:20 वाजता श्रीनगरला पोहोचेल. एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने माहिती दिली की, 'कटरा ते श्रीनगर या ट्रेनच्या मार्गावर एकूण 17 स्थानके आहेत. सर्व स्थानकांवर तपासणी करणे कठीण होईल. त्यामुळे प्रत्येक प्रवाशाचे ओळखपत्र तपासले जाईल आणि त्यांचे सामान कटरामध्येच तपासले जाईल. त्यानंतरच त्यांना 8 डबे असलेल्या ट्रेनमध्ये प्रवास करण्याची संधी मिळेल. या ट्रेनमध्ये 530 प्रवासी प्रवास करू शकतील'.