Delhi New CM: दिल्लीत भाजपने रेखा गुप्ता यांची मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषणा केली आहे. रेखा गुप्ता यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली आहे. निवडणूक आश्वासनांची पूर्तता करण्यापासून ते राष्ट्रीय राजधानीच्या पायाभूत सुविधांचा विकास करण्यापर्यंत आर्थिक व्यवस्थापन करण्यापर्यंत राजधानीत भाजपच्या नवीन सरकारसमोरील आव्हाने प्रचंड असतील. भारतीय जनता पक्षाच्या आमदार रेखा गुप्ता दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री असणार आहे.
रेखा गुप्ता यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड -
दिल्ली राज्य भाजप कार्यालयात केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत त्यांना पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून एकमताने निवडण्यात आले. त्या दिल्लीच्या शालीमार बाग विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच आमदार झाल्या आहेत. आज विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत पक्षाचे सर्व 48 आमदार उपस्थित होते. बैठकीनंतर माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी रेखा गुप्ता यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकमताने निवड झाल्याची घोषणा केली.
हेही वाचा -Delhi CM Announcement: प्रवेश वर्मा, रेखा गुप्ता की आशिष सूद...? दिल्लीच्या सिंहासनावर कोण बसणार
रेखा गुप्ता ठरणार दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री -
रेखा गुप्ता या बनिया समुदायाचे प्रतिनिधित्व करतात. बनिया समुदायाची गणना भाजपच्या मुख्य मतपेढीमध्ये केली जाते. त्यांचे नाव जाहीर करून भाजपने त्यांच्या मूळ मतदारांना मोठा संदेश दिला आहे. दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे रेखा गुप्ता एक महिला आमदार असून दिल्लीची सूत्रे एका महिलेकडे सोपवून भाजपने देशभरातील महिलांना एक संदेशही दिला आहे.
हेही वाचा - दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला केजरीवाल आणि आतिशी यांना आमंत्रण
रेखा गुप्ता या मध्यमवर्गाचे प्रतिनिधित्व करते. रेखा गुप्ता दिल्लीतील शालीमार बाग येथून विजयी झाल्या आहेत, जो पूर्णपणे मध्यमवर्गीय परिसर आहे. भाजपच्या सर्वात मोठ्या समर्थकांमध्ये मध्यमवर्गाचाही समावेश आहे. रेखा गुप्ता यांना दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचण्यास मदत करणारा चौथा घटक म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली त्यांची जवळीक. भाजप संघटनेप्रमाणेच त्यांचा आरएसएसमध्येही खोलवर प्रवेश आहे.