शिमला: काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची अचानकपणे प्रकृती खालावल्याने त्यांना तात्काळ शिमला येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इंदिरा गांधी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, 'सोनिया गांधी यांचे एमआरआय आणि इतर काही आरोग्य चाचण्या केल्या जातील'. 'सध्या सोनिया गांधी यांची प्रकृती स्थिर आहे', अशी माहिती हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे प्रमुख माध्यम सल्लागार नरेश चौहान यांनी दिली. तसेच, सुरक्षेच्या दृष्टीने रुग्णालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आली आहे.
हेही वाचा: 'महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मॅच फिक्सिंग'; राहुल गांधींच्या आरोपांना फडणवीसांचं प्रत्युत्तर
सोनिया गांधी शिमला दौऱ्यावर:
शिमल्याच्या खासगी दौऱ्यावर असताना सोनिया गांधींची प्रकृती अचानकपणे खालावल्याने त्यांना तात्काळ शिमल्याच्या रुग्णालयात दाखल केले. माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून सोनिया गांधी श्वसनाचे विकार आणि कोरोनाव्हायरस नंतरच्या आजारांनी ग्रस्त आहेत. 2022 मध्ये श्वसनाच्या आजारांवर उपचार घेण्यासाठी त्यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर जून 2022 मध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर जून 2022 मध्ये कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सप्टेंबरमध्ये त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.