नागपूर: सुनिता जामगडे अवैध मार्गाने पाकिस्तानात गेल्याचे उघड झाले होते. आता ती गुगल मॅपद्वारे पाकिस्तानात गेल्याचे समोर आले आहे. दोन तासांत एलओसी पार केल्याचं तिने सांगितले आहे. सुनिता इंस्टाग्रामवर पाकिस्तानच्या संपर्कात होती. पाकिस्तानातील जुल्फिकार नावाच्या व्यक्तीशी तिचा संपर्क होता. तसेच सुनिताच्या बँक खात्यांमध्ये संशयास्पद व्यवहार आढळून आले आहेत.
सुनिता जामगडे गुगल मॅपच्या साहाय्याने पाकिस्तानात गेली होती. आता तिचा तपास सुरु आहे. पाकिस्तान प्रवेश करण्यामागे कारण व्यक्तिगत आहे की यामध्ये मोठे रॅकेट आहे. याबाबत सुद्धा तपास यंत्रणा तपास करत आहेत. आतापर्यंतच्या चौकशीत सुनिताने कोणतीही संवेदनशील माहिती पाकिस्तानला दिल्याचे संकेत मिळाले नाहीत.
हेही वाचा : काय सांगता, बोकडाची किंमत चक्क 1 लाख रुपये
सुनिता जामगडे गुगल मॅपद्वारे पाकिस्तानात गेली. एवढचं नाही तर दोन तासात तिने एलओसीपार केली. इंस्टाग्रामवर पाकिस्तानशी संपर्कात असल्याचे तपासात समोर आले. सुनिता पाकिस्तातील जुल्फिकार नावाच्या व्यक्तीशी सोशल मीडियावर संपर्कात होती. सुनिताच्या म्हणण्यानुसार स्टोनच्या व्यवसायासंदर्भात बोलत असल्याचे तिने सांगितले. बँक खात्याचे व्यवहार संशयास्पद असून तिच्या बँक खात्यामध्ये काही भारतीय नागरिकांकडून आलेला ऑनलाईन पैश्यासंदर्भात पोलीस चौकशी करत आहेत.
सुनिताचं पाकिस्तान प्रवेश करण्यामागे व्यक्तिगत कारण आहे की यामध्ये मोठे रॅकेट आहे. याबाबत सुद्धा तपास यंत्रणा तपास करत आहेत. आतापर्यंतच्या चौकशीत सुनिताने कोणतीही संवेदनशील माहिती पाकिस्तानला दिल्याचे संकेत मिळाले नाहीत.