Sunday, August 17, 2025 05:08:43 PM

8th Pay Commission: आठवा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारी कर्मचाऱ्यांसाठी समोर आले मोठे अपडेट!

आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा झाल्यापासून, देशातील लाखो सरकारी कर्मचारी त्याच्या अंमलबजावणीची आतुरतेने वाट पाहू लागले आहेत.

8th pay commission आठवा वेतन आयोग कधी लागू होणार सरकारी कर्मचाऱ्यांसाठी समोर आले मोठे अपडेट
8th Pay Commission
Edited Image

8th Pay Commission: देशातील सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीच्या तारखेशी संबंधित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात जानेवारीमध्ये आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली होती. आठव्या वेतन आयोगाअंतर्गत, केंद्रीय कर्मचाऱ्यांचे वेतन 2.86 च्या फिटमेंट फॅक्टरनुसार वाढू शकते. आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची घोषणा झाल्यापासून, देशातील लाखो सरकारी कर्मचारी त्याच्या अंमलबजावणीची आतुरतेने वाट पाहू लागले आहेत. यापूर्वी असे वृत्त आले होते की, सरकार 1 जानेवारी 2026 पासून आठवा वेतन आयोग लागू करू शकते. पण आता याबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे.

काही तज्ञांच्या मते 1 जानेवारी 2026 पासून आठवा वेतन आयोग लागू करणे खूप कठीण आहे. याचा सरळ अर्थ असा की 1 जानेवारी 2026 रोजी आठवा वेतन आयोग लागू होणार नाही आणि त्यात काही विलंब होऊ शकतो. तथापि, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे की, आठवा वेतन आयोग लागू करण्यासाठी पुरेसा वेळ आहे. कारण तो एक वर्षापूर्वीच जाहीर झाला आहे. 

हेही वाचा - तळीरामांच्या खिशाला लागणार झळ! बिअर 15 टक्क्यांनी महागली; आजपासून नवीन किमती लागू

दरम्यान, अद्याप सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भ अटी जाहीर केलेल्या नाहीत. अशा परिस्थितीत, आठवा वेतन आयोग 1 जानेवारी रोजी लागू होईल का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तथापी, 1 फेब्रुवारी 2025 रोजी सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात आठव्या वेतन आयोगाच्या वाटपाचा उल्लेख नव्हता, असे तज्ज्ञांचे मत आहे. याशिवाय, 7 व्या वेतन आयोगाला 10 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच आठवा वेतन आयोग लागू केला जाईल. या सर्व परिस्थितीचा विचार करता, 1 जानेवारी 2026 पासून आठवा वेतन आयोग लागू करणे कठीण आहे.

हेही वाचा - काय सांगता!! तिरुपतीचे लाडू विकून मंदिराला दरवर्षी मिळतात 'इतके' कोटी रुपये

सर्व कर्मचाऱ्यांना संपूर्ण थकबाकीची रक्कम मिळेल?  

याशिवाय, तज्ज्ञांचे असेही म्हणणे आहे की, जर आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीत विलंब झाला तर त्याचा कर्मचाऱ्यांवर कोणताही परिणाम होणार नाही. विलंब झाल्यास, सरकार सर्व कर्मचाऱ्यांना संपूर्ण थकबाकीची रक्कम म्हणजेच विलंबाच्या कालावधीइतकी थकबाकी देईल.
 


सम्बन्धित सामग्री