Thursday, July 10, 2025 04:02:56 AM

'या' राज्यातील महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त रोडवेज बसमध्ये करता येणार मोफत प्रवास

रोडवेजचे व्यवस्थापकीय संचालक पुरुषोत्तम शर्मा म्हणाले की, मोफत प्रवासाची सुविधा 8 मार्चच्या मध्यरात्रीपासून रात्री 11:59 वाजेपर्यंत उपलब्ध असेल.

या राज्यातील महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त रोडवेज बसमध्ये करता येणार मोफत प्रवास
Free Travel In Roadways Buses on International Women's Day
Edited Image

Free Travel In Roadways Buses on International Women's Day: महिला दिनानिमित्त राजस्थानमध्ये राहणाऱ्या महिलांना राज्य सरकारने मोठे गिफ्ट दिले आहे. 8 मार्च रोजी विशेष पुढाकार घेत, राजस्थान सरकारने संपूर्ण राजस्थानमध्ये रोडवेज बसमध्ये महिलांसाठी मोफत प्रवासाची घोषणा केली आहे. रोडवेजच्या अध्यक्षा शुभ्रा सिंह यांच्या सूचनेनुसार बुधवारी ही घोषणा करण्यात आली. रोडवेजचे व्यवस्थापकीय संचालक पुरुषोत्तम शर्मा म्हणाले की, मोफत प्रवासाची सुविधा 8 मार्चच्या मध्यरात्रीपासून रात्री 11:59 वाजेपर्यंत उपलब्ध असेल.

केवळ राज्यातचं करता येणार मोफत प्रवास - 

ही ऑफर राजस्थान राज्याच्या हद्दीत धावणाऱ्या सर्व सामान्य आणि एक्सप्रेस बसेसवर लागू आहे. या योजनेत एसी आणि व्होल्वो बसेसचा समावेश नाही. आंतरराज्य मार्गांवर प्रवास करणाऱ्या महिलांसाठी मोफत प्रवास फक्त राजस्थानच्या सीमेतच लागू असेल. अधिकाऱ्याने सांगितले की, जर एखादी महिला जयपूरहून दिल्लीला प्रवास करत असेल, तर तिचा राजस्थानमधील प्रवास मोफत असेल आणि राज्याची सीमा ओलांडल्यानंतर, तिला दिल्लीच्या उर्वरित प्रवासासाठी तिकीट खरेदी करावे लागेल.

हेही वाचा - Women''s Day 2025 : तुमच्या घरच्या ''लक्ष्मी''ला बनवा आर्थिकदृष्ट्या सक्षम! या स्मार्ट गुंतवणुकी देतील मोठा लाभ, जाणून घ्या सविस्तर!

केवळ नॉन-एसी बसेसमध्येच मोफत प्रवास उपलब्ध - 

राजस्थान रोडवेजच्या कार्यकारी संचालक (वाहतूक) ज्योती चौहान यांनी सांगितले की, मोफत प्रवासाची सुविधा फक्त नॉन-एसी बसेससाठी उपलब्ध आहे आणि ती राजस्थानमध्ये मर्यादित आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट महिलांना सक्षम बनवणे आणि त्यांच्या गतिशीलतेला प्रोत्साहन देणे आहे. हा उपक्रम महिलांच्या कल्याणाप्रती सरकारची वचनबद्धता प्रतिबिंबित करतो आणि या खास प्रसंगी महिलांना सोयीस्कर आणि मोफत प्रवासाचा अनुभव प्रदान करण्याचा उद्देश आहे.

हेही वाचा - गौतम अदानी यांच्या संपत्तीत एकाच दिवसात 27,800 कोटींची वाढ; नेमक काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या

महिलांच्या योगदानाची ओळख पटविण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 8मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. 2025 चा आंतरराष्ट्रीय महिला दिन 'अ‍ॅक्सिलरेट अ‍ॅक्शन' या थीमवर साजरा केला जाईल. अ‍ॅक्सिलरेट अ‍ॅक्शन ही महिलांच्या प्रगतीवर सकारात्मक परिणाम करणाऱ्या धोरणे, संसाधने आणि उपक्रमांना पुढे नेण्यासाठी एक जागतिक आवाहन आहे.
 


सम्बन्धित सामग्री