Wednesday, November 13, 2024 09:34:34 PM

A case has been filed against Imtiaz Jalil in Pune
पुण्यात इम्तियाज जलील यांच्या विरोधात गुन्हा दाखल

पुण्यातील समर्थ पोलिस स्टेशनमध्ये इम्तियज जलील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात इम्तियाज जलील यांच्या विरोधात गुन्हा दाखल

पुणे :  पुण्यातील समर्थ पोलिस स्टेशनमध्ये इम्तियज जलील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी शेकडो नागरिकांनी पोलीस स्टेशनमध्ये गर्दी केली होती. कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक दाखल झाले असल्याची माहिती समोर येत आहे. कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये देखील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एआयएमआयएम पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांनी एका रॅलीवेळी छत्रपती संभाजीनगरच्या बोर्डावर काळ फासलं होतं. या घटनेच्या निषेधार्थ पुण्यातील विविध पोलीस स्टेशन बाहेर करण्यात बुधवारी आंदोलने आली होती. पोलिसांनी दखल न घेतल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले. 

 

 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo