मुंबई : अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हल्ला झाला. वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी हा हल्ला झाला. या घटनेने सगळीकडे खळबळ उडाली आहे. सैफवर सहा वार झाल्याची माहिती आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
सैफवर बुधवारी रात्री तीन वाजेच्या सुमारास चाकूने हल्ला झाला. सैफवर 6 वार झाल्याची माहिती आहे. सैफवर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चोरीच्या उद्देशानं हल्ला झाल्याची पोलिसांची माहिती दिली आहे.फॉरेन्सिक टीमकडून तपास सुरु आहे. पोलिसांची टीम त्यांच्या घरी दाखल झाली आहे. पोलिसांकडून सीसीटीव्हीत फुटेजची तपासणी करण्यात येत आहे.
हेही वाचा : सैफ अली खानावर घरात घुसून चाकूने हल्ला
सैफ अली खानला 6 जखमा त्यापैकी 2 जखमा खोल
हल्लेखोर रात्रीपासून घरात दबा देऊन बसलेला असेल तेव्हाच त्याने रात्री सैफवर हल्ला केला. त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. शस्त्रक्रिया झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. सैफच्या घरातील नोकरांचीही चौकशी सुरू आहे. लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी सैफ अली खानला 6 जखमा झाल्याची माहिती दिली. त्यापैकी 2 जखमा खोल असल्याचे सांगितले. एक जखम मणक्याच्या जवळ आहे. न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन डॉ. लीना जैन यांच्याकडून शस्त्रक्रिया करण्यात आली. सैफ अली खानवरील शस्त्रक्रिया पूर्ण 2 तास शस्त्रक्रिया सुरू होती.
हेही वाचा : वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी; न्यायालयाबाहेर राडा
फॉरेन्सिकला हल्लेखोराच्या हाताचे ठसे मिळाले
पोलिसांनी घरी काम करणाऱ्या कामगारांना ताब्यात घेतलं. फ्लोअर पॉलिशिंगचं काम करणारे पोलिसांच्या ताब्यात आहेत. पोलिसांची टीम सैफच्या घरी तळ ठोकून आहेत. फॉरेन्सिकला हल्लेखोराच्या हाताचे ठसे मिळाले. पोलिसांकडून सैफच्या नोकरांचीही चौकशी सुरू आहे. सीसीटीव्हीत दोन संशयित आढळले. दोघांपैकी एकानं सैफवर हल्ला केल्याचा अंदाज आहे. दोन्ही संशयितांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. तपासासाठी पोलिसाच्या 6 टीम गठीत करण्यात आल्या आहेत.