Sunday, August 17, 2025 01:42:26 AM

अबू सालेमला तुरुंगातून अज्ञातस्थळी हलवले

दहशतवादी अबू सालेमला रात्री उशिरा नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून कडेकोट बंदोबस्तात अज्ञातस्थळी हलवण्यात आले.

अबू सालेमला तुरुंगातून अज्ञातस्थळी हलवले

नाशिक : दहशतवादी अबू सालेमला रात्री उशिरा नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून कडेकोट बंदोबस्तात अज्ञातस्थळी हलवण्यात आले. 

अबू सालेमला काही दिवसांपूर्वी नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून कडेकोट बंदोबस्तात नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले होते. तिथे अंडासेलमध्ये ठेवले होते. आता अबू सालेमला नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून कडेकोट बंदोबस्तात रात्री उशिरा हलवण्यात आले. नाशिकमधून अबूला नेमके कोणत्या कारागृहात नेण्यात आले हे अद्याप समजलेले नाही. 

दहशतवादी अबू सालेम हा मुंबई साखळी बॉम्ब स्फोटातील प्रमुख आरोपी आहे. नाशिकरोड कारागृहातील अंडासेलमध्ये अबू सालेम महिनाभर होता. त्याला सुरक्षेच्या कारणास्तव तळोजा कारागृहातून नाशिकच्या कारागृहात नेले होते. नाशिकमधून अबूला कुठे आणि का नेले हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. अबूला एका न्यायालयात हजर करायचे असल्यामुळे नाशिकच्या कारागृहातून कडेकोट बंदोबस्तात नेण्यात आल्याचे समजते.


सम्बन्धित सामग्री