Sunday, August 17, 2025 08:02:50 AM

'एकट्या पडलेल्या अजितच्या पाठीशी राहा'

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या आईचे एक भावनिक आवाहन करणारे पत्र प्रसिद्ध झाले आहे.

एकट्या पडलेल्या अजितच्या पाठीशी राहा

बारामती : विधानसभा निवडणुकीचा प्रचार सोमवारी संध्याकाळी संपला. राज्यात विधानसभेसाठी बुधवार २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या आईचे एक भावनिक आवाहन करणारे पत्र प्रसिद्ध झाले आहे. 

बारामती विधानसभा मतदारसंघात काका विरुद्ध पुतण्या अशी निवडणूक होत आहे. विद्यमान आमदार अजित पवार मागील ३० वर्षांपासून आमदार आहेत. अजित पवारांच्या विरोधात त्यांचे पुतणे युगेंद्र पवार हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. युगेंद्र यांना राज्यसभा खासदार शरद पवार आणि लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांचा पाठिंबा आहे. यामुळे बारामतीत काय होणार याकडे अनेकांचे लक्ष आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या आईचे भावनिक आवाहन करणारे पत्र प्रसिद्ध झाले आहे. 

अजित पवारांच्या आईचे पत्र

खरं तर मी काही येथे बोलण्यासाठी आले नाही. मला तेवढं बोलता पण येत नाही. एक आई म्हणून मला एक गोष्ट मात्र मला तुम्हाला अजितच्या बाबतीत सांगायची आहे की अजित लोकांचे प्रश्न, अडचणी सोडवणे साठीच धडपडत असतो. लोकांचे प्रश्न सोडवण्या शिवाय त्याला चैन पडत नाही. त्यासाठी मनामध्ये काही न ठेवता स्पष्टपणे बोलत असतो. पण आज दुःख या गोष्टीच वाटत आज की, एवढं करुनही अजित एकटा पडला आहे. त्याला हरवण्यासाठी घरातलेच लोक त्याच्या मागे लागले आहेत. अजित कसा चुकलाय हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण मला माहिती आहे की, अजितवर काय अन्याय झालाय, पण तो काय सोसतोय हे मलाच माहिती आहे. आजही कुटुंबासाठी तो काही गोष्टी बोलत नाही, पण स्वतः मात्र सगळं सहन करतोय. एवढं मोठं मन त्याचं आहे, तुम्ही बारामतीकरांनी त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे एवढीच तुम्हाला विनंती.


सम्बन्धित सामग्री