Sunday, August 17, 2025 05:12:36 PM

Akola: तब्बल 2 तास शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी दिले महिलेला जीवनदान

या आधी महिलांच्या प्रकृतीसंदर्भात अनेक धक्कादायक घटना आपण ऐकल्या असतील मात्र आता अकोल्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. एका महिलेच्या गर्भाशयात तब्बल 16 किलोचा मांसचा गोळा आढळलाय.

akola तब्बल 2 तास शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी दिले महिलेला जीवनदान

वर्षा मोरे, प्रतिनिधी 

अकोला: या आधी महिलांच्या प्रकृतीसंदर्भात अनेक धक्कादायक घटना आपण ऐकल्या असतील मात्र आता अकोल्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आलीय.  एका महिलेच्या गर्भाशयात तब्बल 16 किलोचा मांसचा गोळा आढळलाय. तब्बल 2 तास शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी या महिलेला जीवनदान दिलंय.  वारंवार पोट दुखणं, पोटाचा घेर वाढणे यामुळे त्रस्त झालेल्या महिलेच्या गर्भाशयातून हा 16 किलो जास्त वजनाचा मासाचा गोळा काढण्यात डॉक्टरांना यश आले. 

हेही वाचा: पीएम धन धान्य योजना; काय आहे योजनेचा फायदा

अकोल्यातल्या लक्ष्मीनारायण मेमोरीयल हॉस्पिटलमध्ये महिलेवर शस्त्रक्रिया पार पडली.. प्रसूती व स्त्री रोग तज्ञ डॉ. मुकेश राठी यांनी ही शस्त्रक्रिया केली आहे .. दरम्यान, परभणी येथील एका 32 वर्षीय महिलेच्या गर्भशयात 16 किलो वजनाची गाठ तयार झाली.. या गाठीमूळ महिला त्रस्त झाली होती. मागील दोन वर्षातच महिलेच्या गर्भशयात 16 किलो वजनाची गाठ तयार झाली.. यामागील कारण अद्याप पर्यंत समजू शकलं नाही.. 

डॉ. मुकेश राठी यांनी या रुग्ण महिलेच्या तपासण्या करून शस्त्रक्रियेची जटीलता जाणून घेत शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रियेत महिलेच्या गर्भाशयातून 16.75 किलो वजनाचा गोळा काढला.. शस्त्रक्रियेदरम्यान गर्भाशयाला वाचवण्यात यश आले. यामुळे ती आई बनू शकणार आहे. आता या महिला रुग्णाचे चालणे, फिरणे, खाणे-पिणे सुरू झाले. 

दरम्यान, अशा शस्त्रक्रिया व एवढे मोठे ट्यूमर क्वचितच आढळले असून, या ट्युमरचा आकार व वजन याची नोंदणी रेकॉर्ड बुकमध्ये करणार असल्याचे डॉ. राठी सांगतायत.. तसेच मांसाच्या गोळ्याचे काही नमुने वैद्यकीय तपासणीसाठी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयाकडे पाठवले असल्याचे ते म्हणाले..32 वर्षीय मूलबाळ नसणारी परभणी येथील ही महिला रुग्ण मागच्या दोन वर्षांपासून पोटाच्या दुखण्याने त्रस्त होती. या संदर्भात तिने उपचार घेतले. मात्र दुखणे बरे होऊ शकले नव्हते ..
 


सम्बन्धित सामग्री