Saturday, August 16, 2025 09:24:37 PM

अजब स्टंट! चालत्या गाडीच्या बोनेटवर महिलेने केला ऑरा फार्मिंग डान्स

यापूर्वी एका 11 वर्षीय मुलाचा चालत्या बोटीवरचा डान्स व्हायरल झाला होता. त्याला ‘ऑरा फार्मर बॉय’ म्हणत लोकांनी पसंती दर्शवली होती. त्याच डान्स स्टेप्सची नक्कल करत महिलेने चालत्या कारवर डान्स केला.

अजब स्टंट चालत्या गाडीच्या बोनेटवर महिलेने केला ऑरा फार्मिंग डान्स
Woman performs aura farming dance on moving car
Edited Image

Aura Farming Dance: सध्या सोशल मीडियावर एक नवीन व्हिडिओ धुमाकूळ घालत आहे, ज्यामध्ये एक महिला बिनधास्तपणे चालत्या मर्सिडीज कारच्या बोनेटवर उभं राहून डान्स करताना दिसत आहे. विशेष म्हणजे हा डान्स सोशल मीडियावर 'ऑरा फार्मिंग' म्हणून ओळखला जातो. यापूर्वी एका 11 वर्षीय मुलाचा चालत्या बोटीवरचा डान्स व्हायरल झाला होता आणि त्याला ‘ऑरा फार्मर बॉय’ म्हणत लोकांनी पसंती दर्शवली होती. त्याच डान्स स्टेप्सची नक्कल करत ही महिला चालत्या कारवर नाचताना दिसत आहे.

महिलेने गाडीच्या बोनेटवर केला ऑरा फार्मिंग डान्स - 

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक महिला मर्सिडीज कारच्या बोनेटवर उभी आहे आणि ती तिथे डान्स करत आहे. व्हिडिओमध्ये ती ऑरा फार्मर बॉयच्या डान्स स्टेपची कॉपी करत असल्याचे दिसत आहे. गाडी हळू चालत असली तरी असे स्टंट करणे जीवासाठी खूप धोकादायक आहे. सध्या या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी कमेंट करायला सुरुवात केली आहे. 

हेही वाचा - इस्रायलचा सीरियावर हल्ला; जीव वाचवण्यासाठी टीव्ही अँकरने स्टुडिओतून काढला पळ

हा धोकादायक स्टंट Instagram वर @nazmeen.sulde या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका वापरकर्त्याने कमेंट केली आहे की, 'चलन भरण्यास तयार राहा.' दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले आहे की, 'अभिनंदन, या उत्तम कल्पनेसाठी, मुंबई वाहतूक पोलिस तुमच्या आयुष्यात प्रवेश करतील.' तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले आहे की, 'चलन भारी असेल.' दुसऱ्या एका वापरकर्त्याने लिहिले की, 'तुम्ही खूप चांगले काम केले आहे, तुम्हाला पुरस्कार मिळाला पाहिजे.' 

हेही वाचा - धनबादमध्ये उंदरांवर 800 बाटल्या दारू पिल्याचा आरोप; काय आहे नेमकं प्रकरण?

सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी जीवाची पर्वा न करता असे स्टंट करणं ही चिंतेची बाब बनली आहे. यामुळे तरुण पिढीवर चुकीचा प्रभाव पडू शकतो. प्रशासन आणि पालकांनी यावर सजग राहण्याची गरज आहे.
 


सम्बन्धित सामग्री