नवी दिल्ली: भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लाच्या पृथ्वीवर परतण्याबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. शुभांशू शुक्ला गेल्या 12 दिवसांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) अॅक्सिओम-4 मोहिमेअंतर्गत काम करत आहेत. योजनेनुसार, शुभांशू शुक्ला आज अॅक्सिओम-4 टीमसोबत पृथ्वीवर परतणार होते. पण युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) ने म्हटले आहे की, अंतराळ स्थानकावर उपस्थित असलेल्या अॅक्सिओम-4 टीमचे पृथ्वीवर परतणे 14 जुलैपूर्वी शक्य नाही.
पृथ्वीवर परतण्यास लागणार विलंब -
अॅक्सिओम-4 टीमच्या परतण्यास 3-4 दिवसांचा विलंब होईल. युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) ने सूचित केले आहे की Axiom-4 टीम 14 जुलैपूर्वी पृथ्वीवर परत येऊ शकत नाही. तथापि, ISRO ने अद्याप Axiom-4 टीमच्या परतण्याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. युरोपियन स्पेस एजन्सीने एक मीडिया अॅडव्हायझरी जारी केली आहे ज्यामध्ये म्हटले आहे की ESA प्रकल्पांतर्गत Axiom-4 मोहिमेत सहभागी असलेले युरोपचे स्लावोज उझनान्स्की-विष्णेव्स्की यांचे 14 जुलैपूर्वी परतणे शक्य नाही.
हेही वाचा - पंतप्रधान मोदींनी अंतराळात गेलेल्या शुभांशू शुक्ला यांच्याशी साधला संवाद; भारतीय अंतराळविराला दिला ''हा'' गृहपाठ
या निवेदनात असंही म्हटलं आहे की, Axiom-4 टीमच्या परतण्याची अद्याप कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही. यासोबतच, असे सांगण्यात आले की त्यांचे परतणे ड्रॅगन अंतराळयानाच्या अनडॉकिंगवर अवलंबून आहे. 25 जून रोजी Axiom-4 टीम फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटरमधून अवकाशासाठी रवाना झाले. 28 तासांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर, अॅक्सिओम-4 टीम 26 जून रोजी आयएसएसवर पोहोचली.
हेही वाचा - अंतराळात यशस्वी झेप घेतल्यानंतर शुभांशू शुक्लाचे आई-वडील झाले भावूक, पहा हृदयस्पर्शी क्षण
त्यानंतर, अॅक्सिओम-4 टीमने 27 जूनपासून अंतराळ केंद्रात आपले काम सुरू केले. या काळात अॅक्सिओम-4 टीमने 31 देशांचे प्रतिनिधित्व करणारे 60 प्रयोग केले. यापैकी 12 प्रयोग इस्रो आणि नासा यांच्या सहकार्याने झाले. यामध्ये 7 इस्रो प्रयोग आणि 5 नासा प्रयोगांचा समावेश आहे.