Sunday, August 17, 2025 02:50:55 AM

'हे' आहे मूतखड्याचे मुख्य कारण.. याच पदार्थांच्या अतिसेवनाने सांधेही धरतात.. असा करा उपाय

युरिक अ‍ॅसिड रक्तात विरघळत असले आणि मूत्रपिंडातून मूत्रमार्गे बाहेर पडत असले तरी ते सातत्याने शरीरात तयार होणे धोकादायक आहे. काही अन्नपदार्थांचे नेहमी सेवन केल्यामुळे ते शरीरात वारंवार तयार होते.

हे आहे मूतखड्याचे मुख्य कारण याच पदार्थांच्या अतिसेवनाने सांधेही धरतात असा करा उपाय

Uric Acid May Cause Kidney Stones : अनेकांना मूतखड्याचा विकार असतो. अनेकदा यासोबतच सांधेदुखीचाही त्रास असतो. यापैकी एका किंवा दोन्हीही समस्यांनी तुम्ही त्रस्त असाल तर तुम्ही तुमच्या आहाराचा बारकाईने अभ्यास करणं आवश्यक आहे. यासाठी इतर काही कारणांसोबतच शरीरात तयार होणारे युरिक अॅसिड कारणीभूत आहे.

युरिक अ‍ॅसिड हे शरीरात तयार होणारे एक प्रकारचे रसायन आहे. जेव्हा तुम्ही लाल मांस, मासे, मसूर, बिअर आणि काही भाज्या यांसारखे प्युरिन नावाचा पदार्थ असलेले अन्न खाता, तेव्हा या प्युरिनवर प्रक्रिया होऊन त्यापासून युरिक अ‍ॅसिड बनते. जरी युरिक अ‍ॅसिड रक्तात विरघळत असले आणि मूत्रपिंडातून मूत्रमार्गे बाहेर पडत असले तरी ते सातत्याने जास्त प्रमाणात तयार होणे धोकादायक आहे.
शरीरात जेव्हा जास्त प्रमाणात युरिक अ‍ॅसिड बनते आणि तेव्हाच मूत्रपिंड ते योग्यरित्या बाहेर काढू शकले नाही, तर हे युरिक अ‍ॅसिड शरीरात जमा होऊ लागते, ज्यामुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. यामध्ये किडनी स्टोन आणि गाउट या मुख्य समस्या आहेत.

हेही वाचा - यकृताच्या आजाराची डोळ्यांत दिसतात लक्षणे; 'हे' जाणवल्यास आधी डॉक्टर गाठा

मूतखडा
अतिरिक्त युरिक अ‍ॅसिड मूत्रपिंडात जमा होऊन खडे तयार होऊ शकतात, जे खूप वेदनादायक असते. जर युरिक अ‍ॅसिड शरीरात जास्त काळ जास्त राहिले तर ते मूत्रपिंडाचे नुकसान करू शकते आणि मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका देखील असतो. ज्या लोकांमध्ये युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त असते, त्यांना अनेकदा टाइप-2 मधुमेह, लठ्ठपणा आणि कोलेस्टेरॉल सारख्या समस्या उद्भवतात.

भरपूर पाणी प्या
दररोज 8 ते 10 ग्लास पाणी प्या. यामुळे शरीरातील युरिक अॅसिड निघून जाते आणि किडनी स्टोनचा धोका कमी होतो.

दररोज सकाळी लिंबू पाणी प्या
लिंबू शरीराला अल्कधर्मी बनवते आणि युरिक अॅसिड विरघळण्यास आणि काढून टाकण्यास मदत करते. कोमट पाण्यात लिंबू पिळून दररोज सकाळी प्या.

चेरी खा
चेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे जळजळ कमी करतात. दररोज चेरी खाल्ल्याने युरिक अॅसिडची पातळी कमी होऊ शकते.

हेही वाचा - व्हिटॅमिन D अभावी हाडं होतात कमजोर; सूर्यप्रकाश मिळत नसेल तर मजबुतीसाठी हे 4 पदार्थ खा

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर
अ‍ॅपल सायडर व्हिनेगर शरीराचे पीएच संतुलन राखण्यास मदत करते. पाण्यात 1 चमचा व्हिनेगर मिसळा आणि खाण्यापूर्वी ते प्या. यामुळे मूत्रपिंड म्हणजेच, किडनीचे कार्य चांगले होते.

जास्त प्युरीन असलेले पदार्थ टाळा आणि जास्त फायबरयुक्त पदार्थ खा
रेड मीट, सी फूड आणि ऑर्गन मीट सारख्या पदार्थांमध्ये प्युरीनचे प्रमाण जास्त असते, जे युरिक अॅसिड वाढवते. ते वारंवार खाण्याचे टाळणे महत्त्वाचे आहे. अख्खे धान्य, फळे आणि भाज्या शरीरातून युरिक अॅसिड पचवण्यास आणि काढून टाकण्यास मदत करतात आणि किडनी निरोगी ठेवतात. यांचा आहारात समावेश जरूर करावा.

(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)


सम्बन्धित सामग्री