Sunday, August 17, 2025 04:03:35 PM

बदलापूर प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक

बदलापूर येथील शाळेत दोन लहान मुलींवर अत्याचार झाल्याची घटना घडली. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महानिरीक्षक आरती सिंग यांच्या अध्यक्षतेत विशेष तपास पथक स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

बदलापूर प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक

मुंबई : बदलापूर येथील शाळेत दोन लहान मुलींवर अत्याचार झाल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी प्राथमिक चौकशीअंती सफाई कामगाराचे काम करणाऱ्या संशयित आरोपी अक्षय शिंदे याला अटक केली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महानिरीक्षक आरती सिंग यांच्या अध्यक्षतेत विशेष तपास पथक स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

कर्तव्यात कसूर करणार्‍या तीन पोलिसांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच  जलदगती न्यायालयात खटला चालविण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना देण्यात आले. या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

बदलापूरच्या घटनेत प्रारंभीच्या काळात कर्तव्यात कुचराई करणारे बदलापूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाणे पोलिस आयुक्तांना दिले. 

बदलापूर घटनेत आतापर्यंत काय घडले ?

  1. याच वर्षी १ ऑगस्ट रोजी २४ वर्षीय आरोपीची शाळेत नेमणूक, लहान मुलींना स्वच्छतागृहात घेऊन जाण्याची जबाबदारी
  2. आरोपीच्या कृत्याची माहिती एका मुलीने घरी दिली
  3. खासगी डॉक्टरने मुलींची वैद्यकीय तपासणी केल्यावर दोन जणींवर लैंगिक अत्याचार झाल्याची बाब उघड
  4. दोन्ही मुलींच्या पालकांनी स्थानिक नेत्याशी संपर्क साधला आणि त्याच्या सल्ल्याने पोलीस ठाणे गाठले
  5. पोलिसांनी तक्रार नोंदवण्याऐवजी पालकांना बराच वेळ बसवून ठेवले
  6. पोलिसांनी नंतर तक्रार नोंदवली आणि तपास सुरू केला
  7. तपासात शाळेतील एक सीसीटीव्ही बंद असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले
  8. शासकीय रुग्णालयात मुलींची तपासणी आणि आरोपीला अटक
  9. महानिरीक्षक आरती सिंग यांच्या अध्यक्षतेत विशेष तपास पथक स्थापन करण्याचे निर्देश 
  10. कर्तव्यात कसूर करणार्‍या वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आणि हेडकॉन्स्टेबल या ३ पोलिसांचे निलंबन
  11. खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. उज्वल निकम यांची नियुक्ती

सम्बन्धित सामग्री