Saturday, August 16, 2025 07:35:46 PM

अ‍ॅपलला मोठा धक्का! BOE डिस्प्ले असलेल्या आयफोनवर बंदी; 'हे' मॉडेल्स बाजारातून हद्दपार

दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंगने BOE वर OLED पॅनल तंत्रज्ञान चोरल्याचा आरोप केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. सध्या OLED तंत्रज्ञानावरून BOE आणि सॅमसंग यांच्यात कायदेशीर लढाई सुरू आहे.

अ‍ॅपलला मोठा धक्का boe डिस्प्ले असलेल्या आयफोनवर बंदी हे मॉडेल्स बाजारातून हद्दपार
iPhone BOE Display Ban
Edited Image

नवी दिल्ली: अमेरिकेच्या इंटरनॅशनल ट्रेड कमिशन (ITC) ने अलीकडेच चीनमध्ये बनवलेल्या BOE डिस्प्ले असलेल्या आयफोन मॉडेल्सच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घातली आहे. दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंगने BOE वर OLED पॅनल तंत्रज्ञान चोरल्याचा आरोप केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. सध्या OLED तंत्रज्ञानावरून BOE आणि सॅमसंग यांच्यात कायदेशीर लढाई सुरू असून त्याचा फटका अॅपलला बसण्याची शक्यता आहे. ही बंदी सध्या अमेरिकन बाजारपेठेसाठी आहे.

काय प्रकरण आहे?

दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंगने चिनी कंपनी BOE वर OLED पॅनल तंत्रज्ञान चोरल्याचा आरोप केला आहे. OLED पॅनलबाबत या दोन्ही कंपन्यांमध्ये कायदेशीर लढाई सुरू आहे. त्यानंतर यूएस इंटरनॅशनल ट्रेड कमिशनने चिनी ब्रँड डिस्प्ले असलेल्या आयफोनच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. BOE आणि सॅमसंगमधील सुरू असलेल्या कायदेशीर लढाईचा सॅमसंगवरही परिणाम होऊ शकतो. तसेच, iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 16, iPhone 16 Plus आणि iPhone 16e च्या विक्रीवरही यामुळे परिणाम होऊ शकतो.

हेही वाचा - मोठी बातमी! सरकारकडून स्टारलिंकला भारतात सेवा सुरू करण्यास मिळाला परवाना

ETNews च्या माहितीनुसार, ITC ने BOE च्या डिस्प्ले असलेल्या उत्पादनांच्या विक्री, जाहिरात आणि अन्य उपक्रमांवर बंदी घातली आहे. BOE ही 2023 पासून Apple ची प्रमुख डिस्प्ले पुरवठादार कंपनी आहे. चिनी कंपनी BOE ही 2023 पासून Apple ची मुख्य पुरवठादार आहे. इतकेच नाही तर, आयफोन 17 मालिकेतील परवडणाऱ्या मॉडेल्समध्ये देखील चिनी कंपनीचा डिस्प्ले वापरला जाईल असे वृत्त देखील येत आहे. तसेच, BOE चा डिस्प्ले आयफोन 17 प्रो मालिकेतील दोन्ही मॉडेल्सच्या मोठ्या प्रमाणात उत्पादनात देखील वापरला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत, या बंदीमुळे, आयफोन 17 मालिकेच्या लाँचिंगलाही विलंब होण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा - कौतुकास्पद! भारतीय वंशाचे सबीह खान होणार ''अॅपल''चे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी

अॅपल उत्पादनांवर परिणाम होणार नाही

तथापि, Apple ने या बंदीमुळे आपल्याला कोणताही फटका बसणार नसल्याचा दावा केला आहे. कंपनीने स्पष्ट केले आहे की ती या कायदेशीर वादाचा भाग नाही, त्यामुळे त्यांच्या उत्पादनांवर त्वरित परिणाम होणार नाही. ITC चा अंतिम निर्णय नोव्हेंबर 2025 मध्ये अपेक्षित आहे. तथापी, ही बंदी केवळ अमेरिकन बाजारात लागू असून जागतिक बाजारातील विक्रीवर सध्या याचा प्रभाव नाही. 
 


सम्बन्धित सामग्री