नवी दिल्ली: भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला हे 10 जुलै 2025 रोजी त्यांच्या क्रूसह पृथ्वीवर परतणार होते. परंतु त्यांच्या परतण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली. 11 जुलै रोजी अॅक्सिओम स्पेसने अंतराळवीरांबाबत एक नवीन अपडेट दिले आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की, 14 जुलै सकाळी 7:05 वाजता एक्स4 क्रूला अंतराळ स्थानकातून अनडॉक केले जाईल. गेल्या 13 दिवसांपासून कॅप्टन शुभांशू शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) वर अॅक्सिओम-4 मोहिमेवर काम करत आहेत.
अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला काल परतणार होते, परंतु ३ दिवसांपर्यंत विलंब झाल्याचे अपडेट समोर आले. तथापि, त्यात वेळेचे अपडेट देण्यात आले नव्हते. 11 जुलै रोजी अॅक्सिओम स्पेसने एक्सवर एक पोस्ट करत अॅक्सिओम-4 मधील टीम परतण्याची तारीख सांगितली आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'X4 क्रूला 14 जुलै रोजी सकाळी 7:05 वाजता अंतराळ स्थानकातून अनडॉक केले जाईल.
हेही वाचा - अॅक्सिओम-4 टीम अंतराळात अडकली? शुभांशू शुक्ला आज पृथ्वीवर परतणार नाही
डॉक हा शब्द अंतराळ स्थानकाशी जोडलेल्या स्पेस कॅप्सूल, शटल आणि मालवाहू जहाजांसाठी वापरला जातो. जेव्हा ते अंतराळ स्थानकापासून वेगळे केले जाते तेव्हा त्या प्रक्रियेला 'अनडॉक' म्हणतात. याशिवाय, अनडॉक हा शब्द दुरुस्तीसाठी किंवा त्याची दिशा बदलण्यासाठी देखील वापरला जातो.
हेही वाचा - पंतप्रधान मोदींनी अंतराळात गेलेल्या शुभांशू शुक्ला यांच्याशी साधला संवाद; भारतीय अंतराळविराला दिला ''हा'' गृहपाठ
अॅक्सिओम-4 मिशन 25 जून रोजी सुरू झाले. अॅक्सिओम-4 टीम फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटरमधून अवकाशासाठी रवाना झाले. अॅक्सिओम-4 टीमला आयएसएसपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 28 तास लागले होते.