नवी दिल्ली: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरने 2000 रुपयांच्या नोटांसंदर्भात मोठी अपडेट शेअर केली आहे. अलीकडेच, आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी एक निवेदन जारी केले आहे. त्यानुसार आता 2000 च्या नोटा जास्त काळ चलनात राहणार नाहीत. परंतु त्या कायदेशीर चलनात राहतील, म्हणजेच या नोटा अवैध राहणार नाहीत.
हेही वाचा - 'हा' शेअर बनला मल्टीबॅगर! गुंतवणूकदारांच्या 1 लाख रुपयांच्या शेअरची किंमत झाली 3.5 कोटी रुपये
2 हजारांच्या नोटा फार काळ बाजारात दिसणार नाहीत
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी संसदीय स्थायी समितीच्या बैठकीत याबाबत माहिती दिली आहे. बैठकीत अनेक खासदारांनी 2000 च्या नोटांच्या चलनाबद्दल प्रश्न विचारले, ज्याच्या उत्तरात संजय मल्होत्रा म्हणाले की या नोटा फार काळ बाजारात दिसणार नाहीत. आरबीआयने एक वर्षापूर्वी घोषणा 2000 रुपयांच्या नोटासंदर्भात सूचना जारी केली होती.
हेही वाचा - PM किसान योजनेचा 20 वा हप्ता मिळविण्यासाठी 'हे' काम करा; अन्यथा मिळणार नाही लाभ
आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2024 पर्यंत सुमारे 98.08% नोटा परत आल्याचे आरबीआयने म्हटले आहे. या नोटांचे एकूण मूल्य 19 मे 2023 रोजी 3.56 लाख कोटी रुपयांवरून 29 नोव्हेंबर 2024 पर्यंत 6,839 कोटी रुपयांवर आले आहे. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर 2016 मध्ये आरबीआयने 2000 रुपयांची नवीन नोट जारी केली होती.