Monday, May 12, 2025 06:35:04 AM

Sushant Singh Rajput Death Case: मोठी बातमी! सुशांत सिंह राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्तीला CBI कडून क्लीन चिट

4 वर्षांच्या तपासानंतर, सीबीआयने आता क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. वृत्त आणि सूत्रांनुसार, रिया आणि तिच्या कुटुंबाला या प्रकरणात क्लीन चिट देण्यात आली आहे.

sushant singh rajput death case मोठी बातमी सुशांत सिंह राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्तीला cbi कडून क्लीन चिट
Rhea Chakraborty, Sushant Singh Rajput
Edited Image

Sushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सीबीआयने आज मुंबई न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर आरोप केले होते. तसेच रियाने सुशांतच्या कुटुंबावर केलेले आरोप केले होते. सीबीआयने दोन्ही प्रकरणांमध्ये क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सीबीआयने सुशांत सिंग राजपूत प्रकरण ताब्यात घेतले आणि तपास सुरू केला. 4 वर्षांच्या तपासानंतर, सीबीआयने आता क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे. वृत्त आणि सूत्रांनुसार, रिया आणि तिच्या कुटुंबाला या प्रकरणात क्लीन चिट देण्यात आली आहे.

सीबीआयने दाखल केले आरोपपत्र - 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांत सिंग राजपूतला कोणी आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा कोणताही पुरावा सीबीआयला सापडला नाही. सुशांतच्या कुटुंबाला मुंबई न्यायालयात निषेध याचिका दाखल करण्याचा पर्याय आहे. सीबीआयने एम्स तज्ज्ञांच्या मदतीने सुशांतच्या आत्महत्या आणि फसवणूक प्रकरणाची चौकशी केली होती. 

हेही वाचा - Chhaava OTT Release Date : विक्की कौशलचा ‘छावा’ लवकरच OTT वर, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल

सुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणात, एम्सच्या फॉरेन्सिक टीमने कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार झाल्याचा इन्कार केला होता. एमएलएटी मार्फत चौकशीसाठी सोशल मीडिया चॅट्स अमेरिकेला पाठवण्यात आल्या. तपासात असे दिसून आले की सुशांत सिंग राजपूतच्या चॅटमध्ये छेडछाड करण्यात आली नव्हती.

हेही वाचा - युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माच्या नात्याचा निर्णय 'या' दिवशी होणार; घटस्फोटानंतर क्रिकेटपटू पूर्व पत्नीला देणार 'इतकी' पोटगी

काय आहे संपूर्ण प्रकरण काय आहे?

सुशांत सिंग राजपूतची प्रेयसी रिया चक्रवर्तीने स्वतः गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. या प्रकरणाची चौकशी सीबीआयच्या वतीने तत्कालीन आयपीएस एसपी नुपूर प्रसाद यांनी केली होती. 2020 मध्ये, जेव्हा देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला होता, तेव्हा अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह त्याच्या घरात फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. यानंतर, सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबाने रिया चक्रवर्तीवर सुशांत सिंगला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर रिया चक्रवर्तीला बराच काळ चौकशीला सामोरे जावे लागले होते.


सम्बन्धित सामग्री