Sunday, August 17, 2025 04:07:21 PM

वेव्हज् परिषदेतील पॅव्हेलियनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट

‘ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट’ वेव्हज्-2025 जागतिक परिषदेनिमित्त उभारण्यात आलेल्या भारत पॅव्हेलियनला  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली.

वेव्हज् परिषदेतील पॅव्हेलियनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट

मुंबई: वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील वर्ल्ड जिओ सेंटर येथे ‘ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट’ वेव्हज्-2025 जागतिक परिषदेनिमित्त उभारण्यात आलेल्या भारत पॅव्हेलियनला  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली.

भारत पॅव्हेलियनमध्ये हरियाणा, पंजाब, राजस्थान, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा,गोवा राज्यांचे पॅव्हेलियन उभारण्यात आले.याशिवाय  नेटफ्लिक्स, जिओ, यू ट्यूब, मेटा,स्टार्टअप,  विविध मनोरंजन  आणि वृत्तवाहिन्या, चित्रपट निर्मिती संस्थाचे पॅव्हेलियन उभारण्यात आले. 

सर्जनशीलता, सुसंवाद आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन आणि येणाऱ्या काळात या क्षेत्रात भारताची भविष्यातील कशी वाटचाल याचे दर्शन भारत पॅव्हेलियनला मध्ये पाहायला मिळत असल्याचे  मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.यावेळी फडणवीस यांनी विविध पॅव्हेलियनला भेट देऊन उपस्थित कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली.

 वेव्हज् परिषदेत कोणते करार झाले पाहुयात: 
>मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वेव्हज् 2025 परिषदेमध्ये 8000 कोटी रुपयांचे विविध सामंजस्य करार करण्यात आले. 
>नवी मुंबईत ‘एज्यू सिटी’ उभारणार  ‘एज्यू सिटी’ मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठांचा समावेश. 
> परदेशातील शिक्षणाचं स्वप्न देशातच पूर्ण होणार. 
>राज्याच्या उद्योग विभागामार्फत प्राईम फोकस कंपनी सोबत 3000 कोटी रुपयांचा करार .यामुळे अडीच हजार रोजगारनिर्मितीची अपेक्षा  
> प्राईम फोकसकडून मुंबईत 200 एकरवर अत्याधुनिक चित्रनगरीची उभारणी होणार. 
>  गोदरेज सोबत 2000 कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आला. गोदरेजसोबत पनवेलमध्ये एए स्टुडिओ उभारणार. 
> गोदरेजसोबतच्या करारामुळे 800 रोजगारनिर्मिती होणार


 


सम्बन्धित सामग्री