मुंबई : काँग्रेसने एका माजी भारतीय गुप्तचर अधिकाऱ्यावर केलेल्या निराधार आरोपांबाबत ट्विट केले होते, ज्यावर मुंबई भाजपा सचिव प्रतिक कर्पे यांनी 'भारत तोडणे हेच काँग्रेसचे धोरण' असल्याची जोरदार टीका केली. या टीकेनंतर मुंबई काँग्रेसने आपले ट्विट डिलीट केले, ज्यामुळे काँग्रेसवर पळ काढण्याची नामुष्की ओढवली आहे.
प्रतिक कर्पे यांनी काँग्रेसवर टीका करत म्हटले, "फोडा आणि राज्य करा, ही काँग्रेसची नीती आहे, आणि भारत तोडणे हेच त्यांचे धोरण आहे." अमेरिकेच्या न्याय विभागाने खलिस्तानी अतिरेकी गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप एका माजी भारतीय गुप्तचर अधिकाऱ्यावर केला होता. यास काँग्रेसचे समर्थन देशासाठी घातक असल्याचे प्रतिक कर्पे यांनी सांगितले. देशाच्या विभाजनाला जबाबदार असलेले काँग्रेसचे नेते आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा खराब करत असल्याचाही आरोप त्यांनी केला.
"भारत जोडो यात्रा काढणारेच भारत तोडण्याच्या मार्गावर आहेत. देशासाठी लढणाऱ्या वीरांना बदनाम करण्याचे काम काँग्रेस करत आहे," असा टोलाही प्रतिक कर्पे यांनी लगावला.