Sunday, August 17, 2025 05:09:54 PM

काँग्रेस आणि उद्धव यांच्यात बिनसले

विधान परिषदेच्या निवडणुकीवरून काँग्रेस आणि उद्धव यांच्यात बिनसले आहे.

काँग्रेस आणि उद्धव यांच्यात बिनसले

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीवरून काँग्रेस आणि उद्धव यांच्यात बिनसले आहे. उद्धवने मविआतील सहकारी घटक पक्षांशी चर्चा न करता परस्पर उमेदवार जाहीर केले. यामुळे काँग्रेस उद्धव यांच्यावर नाराज आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उद्धव यांना फोन करून त्यांच्याशी या मुद्यावर चर्चा करण्याचा प्रयत्न केला. पण उद्धव यांनी एकदाही फोन घेतला नाही. या प्रकाराची माहिती देत नाना पटोले यांनी त्यांची नाराजी जाहीर केली. 

विधान परिषद निवडणूक - 

  1. मतदान - बुधवार २६ जून २०२४
  2. मतदानाची वेळ सकाळी ७.०० वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत
  3. मतमोजणी सोमवार १ जुलै २०२४

भाजपाचे उमेदवार

  1. किरण शेलार - मुंबई पदवीधर
  2. शिवनाथ दराडे - मुंबई शिक्षक
  3. निरंजन डावखरे - कोकण पदवीधर

शिउबाठाचे उमेदवार

  1. अनिल परब - मुंबई पदवीधर
  2. ज. मो. अभ्यंकर - मुंबई शिक्षक
  3. किशोर जैन - कोकण पदवीधर
  4. संदीप घुळवे - नाशिक शिक्षक

काँग्रेसचे उमेदवार

  1. रमेश कीर - कोकण पदवीधर

सम्बन्धित सामग्री