Sunday, August 17, 2025 03:51:57 PM

आमच्यासाठी 'शंखनाद', काहींसाठी 'ऐलान'

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. हा आमच्यासाठी 'शंखनाद' तर काहींसाठी 'ऐलान - देवेंद्र फडणवीस

आमच्यासाठी शंखनाद काहींसाठी ऐलान

मुंबई : 'महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. हा आमच्यासाठी 'शंखनाद' तर काहींसाठी 'ऐलान' आहे; या शब्दात कोणते पक्ष कोणाच्या बाजूने याचे सूतोवाच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार इथेच आहे. मविआला आव्हान देतो. त्यांनी त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, असेही एका प्रश्नाचे उत्तर देताना फडणवीस म्हणाले. 

राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. महाराष्ट्रात एका टप्प्यात निवडणूक होणार आहे. राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी आहे. आचारसंहिता लागू झाली आहे. 

महायुतीच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

मविआच्या आरोपांना महायुतीचे प्रगतीपुस्तकातून उत्तर

विरोधकांनी बोलताना तारतम्य ठेवावं - अजित पवार
कोणताही घटक योजनांपासून दूर नाही - अजित पवार 
आमच्यासाठी 'शंखनाद', काहींसाठी 'ऐलान' - देवेंद्र फडणवीस
सिंचनाच्या क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी - देवेंद्र फडणवीस
काँग्रेस लाडकी बहिणविरोधात न्यायालयात गेली. सरकारच्या योजनांबाबत विरोधक गोंधळलेले - देवेंद्र फडणवीस
मविआचं स्थगिती सरकार, आमचं गतिशील सरकार - देवेंद्र फडणवीस
शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय अंमलात आला. दिवसा वीज देण्याचे संपूर्ण नियोजन केले - देवेंद्र फडणवीस
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून लाखावर उद्योजक निर्माण केले - देवेंद्र फडणवीस
वाढवण बंदर हे ऐतिहासिक काम असणार आहे. जगातील टॉप टेनमध्ये हे बंदर राहणार आहे - देवेंद्र फडणवीस
देशातील एकूण गुंतवणुकीपैकी ५२ टक्के महाराष्ट्रात - देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्राला कुलुपबंद करण्याचा विरोधकांचा डाव हाणून पाडू - देवेंद्र फडणवीस
जागावाटप लवकरच जाहीर करू - देवेंद्र फडणवीस
बाबा सिद्दिकी प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. पोलीस अधिक माहिती देतील - देवेंद्र फडणवीस
लाडकी बहीणच्या विरोधात जाणाऱ्यांचा कार्यक्रम होणार - एकनाथ शिंदे
मविआ नेत्यांना सुपरमॅन व्हायचंय. आम्हाला कॉमनमॅनला सुपरमॅन करायचंय - एकनाथ शिंदे
पायाभूत सुविधांमध्ये महाराष्ट्र पहिला. उद्योगांना महायुतीने रेड कार्पेट दिलं. यामुळे विरोधकांना पराभव दिसू लागलाय - एकनाथ शिंदे


सम्बन्धित सामग्री