Friday, May 16, 2025 02:23:24 PM

Domino's पिझ्झा बनवणाऱ्या कंपनीने खरेदी केली Coca-Cola; 10,000 कोटी रुपयांच्या कराराला मंजूरी

या कराराची अंदाजे किंमत सुमारे 10,000 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. यामुळे जुबिलंट ग्रुपला कोका-कोलाच्या देशव्यापी वितरण नेटवर्क आणि पुरवठा साखळीत थेट भागीदारी मिळेल.

dominos पिझ्झा बनवणाऱ्या कंपनीने खरेदी केली coca-cola 10000 कोटी रुपयांच्या कराराला मंजूरी
Domino's Pizza Company Acquired by Coca-Cola प्रतिकात्मक प्रतिमा
Edited Image

नवी दिल्ली: भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाने (CCI) ज्युबिलंट बेव्हरेजेस लिमिटेड (JBL) ला हिंदुस्तान कोका-कोला होल्डिंग्ज प्रायव्हेट लिमिटेड (HCCH) मधील 40 % हिस्सा खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. या कराराची अंदाजे किंमत सुमारे 10,000 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. यामुळे जुबिलंट ग्रुपला कोका-कोलाच्या देशव्यापी वितरण नेटवर्क आणि पुरवठा साखळीत थेट भागीदारी मिळेल. जुबिलंटकडे भारतात डोमिनोजची फ्रँचायझी देखील आहे.

स्थानिक भागीदारींना मिळणार प्रोत्साहन - 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेस लिमिटेड (HCCB) भारतात 13 उत्पादन कारखाने चालवते, जिथे विविध प्रकारचे कोल्ड्रिंक्स आणि सॉफ्ट ड्रिंक्स तयार केले जातात. स्थानिक भागीदारांचा सहभाग वाढवून त्यांचे कामकाज अधिक लवचिक आणि बाजारपेठेवर केंद्रित करणे ही कोका-कोलाची रणनीती आहे.

हेही वाचा - Dollar Vs Rupee: डॉलरच्या तुलनेत रुपया वधारला! 7 महिन्यांतील सर्वात मोठी वाढ

कोका-कोलाने त्यांच्या कामकाजात बदल करण्याची ही पहिलीच वेळ नाही. अलीकडेच, सीसीआयने कंधारी ग्लोबल बेव्हरेजेसचे बॉटलिंग प्लांट 2000 कोटी रुपयांना खरेदी करण्याच्या प्रस्तावालाही मान्यता दिली होती. यावरून असे दिसून येते की कोका-कोला भारतातील त्यांच्या बॉटलिंग युनिट्स स्थानिक कंपन्यांना देऊन ब्रँडिंग, मार्केटिंग आणि धोरणात्मक नियंत्रणावर लक्ष केंद्रित करू इच्छित आहे.

हेही वाचा - 50 दिवसांत 30% नफा... मग अचानक पेटीएमचे शेअर्स का घसरले? कशाने ब्रेक लावले?

या करारात सहभागी असलेली हिंदुस्तान कोका-कोला होल्डिंग्ज (HCCH) ही एक होल्डिंग कंपनी आहे जी अमेरिकास्थित कोका-कोला कंपनीची उपकंपनी आहे. एचसीसीएचची उपकंपनी हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेस (एचसीसीबी) भारतात उत्पादन आणि विक्री हाताळते. त्याच वेळी, जुबिलंट बेव्हरेजेस लिमिटेड आणि जुबिलंट बेव्हको लिमिटेड या जुबिलंट भारतीय ग्रुपच्या नवीन कंपन्या आहेत ज्या या करारात गुंतवणूक करत आहेत.


सम्बन्धित सामग्री