मुंबई:अंडी भारतीय घरात एक महत्त्वाचा आहार मानली जातात. प्रोटीनचा उत्तम स्रोत असलेल्या अंड्यांचे सेवन अनेक प्रकारे केले जाते. नाश्त्यात ऑम्लेट, सूप, डिनरमध्ये मसालेदार अंडा करी किंवा साधं उकडलेलं अंडं. अंडे केवळ स्वादिष्टच नसून, आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. अंड्यात प्रोटीन, व्हिटॅमिन्स, आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात, जे हाडांना मजबूती देण्यास मदत करतात.
अंडी फ्रिजमध्ये ठेवली जातात, पण ती किती काळ टिकतात? आणि त्यांना योग्य पद्धतीने कसे स्टोर करावे? चला, जाणून घेऊया.
फ्रिजमध्ये अंडी किती काळ ताजी राहतात?
अंडी फ्रिजमध्ये 4°C (40°F) किंवा त्याहून कमी तापमानावर ठेवले तर ते तीन ते पाच आठवड्यांपर्यंत ताजी राहू शकतात. अंड्याच्या पॅकिंगवर 'बेस्ट बिफोर' तारीख दिली असते. ही तारीख संपल्यानंतरही अंडी सुरक्षित असू शकतात, पण त्यांना योग्य पद्धतीने स्टोर करणे आवश्यक आहे.अंड्यांचे ताजेपण राखण्यासाठी त्यांना त्यांच्या ओरिजिनल कार्टनमध्येच ठेवा.
अंडी खराब झाली का हे कसे तपासायचं?
अंडी फ्रिजमध्ये ठेवली तरी तरी खराब होऊ शकतात. खराब झाली की ताजी आहेत हे ओळखण्यासाठी एक सोपी पद्धत आहे, ती म्हणजे फ्लोट टेस्ट:
1. एक बाऊल पाण्याने भरा आणि त्यात अंडे टाका.
2. जर अंडं पाण्यात पूर्णपणे डुबून गेलं आणि खाली पडले, तर ते ताजं आहे
3. जर अंडं थोडं उभं राहिलं, तर ते जरा जुने झाले आहे, पण अजूनही ते खाता येऊ शकते
4. जर अंडं पाण्यात तैरलं, तर ते खराब झालं आहे.
हेही वाचा :खरबूजाच्या बिया फेकल्याने होऊ शकते ३ हजार रुपयांचे नुकसान
अंडी ताजी कशी ठेवावीत ?
अंडी स्टोर करताना त्यांचं ठेवण्याचं स्थान महत्त्वाच आहे. त्यांना फ्रिजच्या सर्वात थंड भागात ठेवावं आणि कार्टनमध्येच ठेवावं . अंड्यांना फ्रिजच्या दरवाज्यात ठेवण्याचा प्रयत्न करू नका कारण त्याठिकाणी तापमानात खूप चढ-उतार होत असते , ज्यामुळे अंडी खराब होऊ शकतात.
अंडी जर योग्य पद्धतीने स्टोर केली तर ती खूप काळ टिकू शकतात. फ्लोट टेस्टच्या मदतीने आपण सहज ओळखू शकतो की अंडी खराब झाली आहेत की नाही. त्यामुळे, पुढच्या वेळी अंडी फ्रिजमध्ये ठेवताना या सोप्या टिप्स वापरून बघा.