PF Balance Check: जर तुम्ही नोकरी करणारे असाल, तर तुमच्या पगारातून दर महिन्याला पीएफ (Provident Fund) म्हणजेच भविष्य निर्वाह निधी कापला जातो. ही रक्कम तुमच्या उज्ज्वल भविष्याची आर्थिक शिदोरी असते. पण, बर्याच वेळा आपण फक्त पगारात किती कपात झाली यावर लक्ष केंद्रित करतो आणि हे विसरून जातो की आपल्या पीएफ खात्यात किती रक्कम जमा झाली आहे, याचा तपास करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. पीएफ बॅलन्स तपासणे केवळ सहज आहेच, पण यामुळे तुमच्या आर्थिक नियोजनातही स्पष्टता येते. तुम्हाला निवृत्तीपूर्वी खर्चाचे नियोजन करायचे असेल, किंवा कोणत्या आपत्कालीन प्रसंगी पीएफ मधून पैसे काढायचे असतील, तर बॅलन्सची माहिती असणे खूपच आवश्यक ठरते. आजच्या डिजिटल युगात हे सर्व काही अगदी काही मिनिटांत आणि घरबसल्या करता येते, फक्त तुमच्याकडे UAN क्रमांक, नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि इंटरनेट कनेक्शन असणे गरजेचे आहे. आता बघूया, अशा कोणत्या 5 सोप्या पद्धती आहेत ज्या वापरून तुम्ही तुमचा PF बॅलन्स त्वरित तपासू शकता.
1. उमंग (Umang App) अॅपद्वारे पीएफ बॅलन्स तपासा
उमंग (UMANG) अॅप ही एक सरकारी अॅप्लिकेशन आहे जी EPFO च्या सर्व सेवा एका ठिकाणी उपलब्ध करून देते. या अॅपद्वारे पीएफ बॅलन्स तपासणे अत्यंत सोपे आहे:
• डाउनलोड करा: Google Play Store किंवा App Store वरून उमंग अॅप डाउनलोड करा.
• नोंदणी करा: तुमचा मोबाईल नंबर टाकून OTP द्वारे नोंदणी पूर्ण करा.
• EPFO सेवा निवडा: अॅपमध्ये “सर्व सेवा” या विभागात EPFO निवडा.
• ‘पासबुक पहा’ वर क्लिक करा: या पर्यायावर क्लिक करून UAN आणि पासवर्ड टाका.
• शिल्लक पहा: लॉगिन झाल्यावर तुमचा पीएफ पासबुक दिसेल, ज्यात तुमचा बॅलन्स आणि व्यवहार तपशील असतो.
2. मिस्ड (Missed Call) कॉलद्वारे त्वरित माहिती मिळवा
जर इंटरनेट वापरणे शक्य नसेल, तर मिस्ड कॉल ही अतिशय सोपी पद्धत आहे:
• 9966044425 या नंबरवर मिस्ड कॉल द्या तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून.
• काही सेकंदांत तुमच्या मोबाईलवर एक SMS येईल, ज्यात तुमचा पीएफ बॅलन्स आणि शेवटचा व्यवहार नमूद असेल.
• कोणताही अॅप डाऊनलोड किंवा लॉगिन आवश्यक नाही ही पद्धत सर्वात झटपट आहे!
3. एसएमएसद्वारे (SMS) ऑफलाइन माहिती मिळवा
इंटरनेट नसतानाही, फक्त एक मेसेज पाठवून बॅलन्स मिळवता येतो:
• तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून टाइप करा:
EPFOHO UAN आणि पाठवा 7738299899 या नंबरवर.
• काही वेळात तुमच्या मोबाईलवर बॅलन्ससह व्यवहाराचा SMS येईल.
• हि सेवा 10 भाषांमध्ये उपलब्ध असून, तुम्ही भाषा देखील नमूद करू शकता (उदा. EPFOHO UAN MAR – मराठीसाठी).
4. EPFO पोर्टलवरून ऑनलाईन तपासणी
EPFO ची अधिकृत वेबसाईट तुमच्या खात्याची सविस्तर माहिती देते:
• वेबसाईटवर जा: https://www.epfindia.gov.in
• 'Our Services' पर्यायावर क्लिक करून 'For Employees' विभागात जा आणि 'Member PassbooK' निवडा.
• UAN, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून लॉगिन करा.
• OTP (Otp Verification) पडताळणी पूर्ण करा.
• लॉगिन झाल्यावर संबंधित खाते निवडा आणि पासबुक पाहा बॅलन्स, योगदान व व्याजसह सर्व तपशील उपलब्ध असतो.
5. उमंग (Umang Website) वेबसाईटवरून तपासणी (अॅप नको असल्यास)
जर अॅप वापरायचा नसेल तर UMANG ची वेबसाईटदेखील बॅलन्स तपासण्यासाठी उत्तम पर्याय आहे:
• वेबसाईट: https://web.umang.gov.in
• EPFO सेवा शोधा आणि 'View Passbook' वर क्लिक करा.
• UAN आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा.
• तुमचे पासबुक स्क्रिनवर दिसेल त्यात तुमचा पीएफ बॅलन्स आणि संपूर्ण व्यवहाराची माहिती पाहता येईल.
महत्त्वाच्या लिंक्स:
• EPFO वेबसाइट: https://www.epfindia.gov.in
• पासबुक थेट लिंक: https://passbook.epfindia.gov.in
• UMANG वेबसाईट:https://web.umang.gov.in
तुमच्या मेहनतीचा पैसा कुठे आणि किती जमा झाला आहे, हे जाणून घेण्यासाठी. वर दिलेल्या कोणत्याही पद्धतीचा वापर करून, तुम्ही अगदी सहज आणि जलद तुमचा PF बॅलन्स तपासू शकता.