Sunday, August 17, 2025 05:15:52 PM

Gold Downfall Prediction: सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी! पुढील काही दिवसात सोने 40 हजार रुपयांनी होऊ शकते स्वस्त

येत्या काही महिन्यांत ते 40 टक्क्यांपर्यंत घसरू शकतात. सोन्याच्या किमतीतील या घसरणीमुळे भारतीय बाजारपेठेत पुन्हा एकदा सामान्य माणसाच्या आवाक्यात सोने येऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

gold downfall prediction सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी पुढील काही दिवसात सोने 40 हजार रुपयांनी होऊ शकते स्वस्त
Gold
Edited Image

Gold Downfall Prediction: सोनेप्रेमी आणि गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी आहे. सोन्याचे भाव, जे अलिकडे गगनाला भिडले होते, येत्या काही महिन्यांत ते 40 टक्क्यांपर्यंत घसरू शकतात. सोन्याच्या किमतीतील या घसरणीमुळे भारतीय बाजारपेठेत पुन्हा एकदा सामान्य माणसाच्या आवाक्यात सोने येऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आज 4 एप्रिल रोजी सोन्याच्या किमतीत सुमारे 1700 रुपयांची घसरण झाली आहे. येत्या काळात सोन्याची किंमत 40,000 ते 50000 रुपयांनी कमी होऊ शकते. 

अमेरिकन विश्लेषक फर्म मॉर्निंगस्टारचा अंदाज आहे की, येत्या काही महिन्यांत सोन्याच्या किमती 38 ते 40 टक्क्यांनी कमी होऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते, जागतिक आर्थिक परिस्थिती, मध्यवर्ती बँकांच्या धोरणांमुळे आणि अमेरिकन डॉलरच्या मजबूतीमुळे सोन्याच्या किमतीत घसरण होऊ शकते. यासोबतच, आर्थिक बाजारात सुधारणा झाल्यास सोन्याच्या किमतीतही घट होऊ शकते. विशेषतः अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात शुल्काची घोषणा केल्यानंतर सोने आणि चांदीच्या किमती घसरल्या आहेत.

हेही वाचा - खुशखबर! सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्ट 8 मार्च रोजी जन्मलेल्या मुलींच्या नावाने करणार FD

सोन्याच्या मागणी आणि पुरवठ्याचा परिणाम - 

अहवालानुसार, वित्तीय सेवा कंपनी मॉर्निंगस्टारचे विश्लेषक जॉन मिल्स यांचे मत आहे की, सोन्याच्या किमती सुमारे 38% ने घसरून 1820 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचू शकतात. जर असे झाले तर भारतातील सोन्याच्या किमतीत 55 हजार रुपयांपर्यंत घट होऊ शकते. या घसरणीमागे दोन मुख्य कारणे म्हणजे सोन्याचा वाढता पुरवठा आणि कमी होत जाणारी मागणी.

हेही वाचा - PPF खातेधारकांसाठी आनंदाची बातमी! अर्थमंत्र्यांनी बदलले नियम; आता तुम्हाला 'हे' शुल्क भरावे लागणार नाही

जेव्हा सोन्याचे भाव जास्त असतात तेव्हा खाण कंपन्या अधिक सोने काढतात, ज्यामुळे सोन्याचा साठा वाढतो. याव्यतिरिक्त, मध्यवर्ती बँका आणि गुंतवणूकदार अधिक सोने खरेदी करत आहेत, परंतु किमती वाढल्याने मागणी कमी होत आहे. या वर्षी मध्यवर्ती बँका त्यांच्या सोन्याच्या साठवणुकीत कपात करू शकतात, ज्यामुळे भविष्यातील मागणी कमी होऊ शकते आणि किमती घसरू शकतात. तथापी, जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर येत्या काही महिन्यांत घसरत्या किमतींचा फायदा तुम्ही घेऊ शकता. या घसरणीमुळे सोने पुन्हा मध्यमवर्गाच्या आवाक्यात येऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

 Disclaimer: शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे. नियम व अटी काळजीपूर्वक वाचा. जय महाराष्ट्र कोणत्याही नफ्या-तोट्यास जबाबदार नाही. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या!


सम्बन्धित सामग्री