Sunday, August 17, 2025 05:16:57 PM

भारताचा डिजिटल स्ट्राईक! बलुचिस्तान टाईम्स आणि बलुचिस्तान पोस्ट न्यूज पोर्टलच्या X अकाउंट बंदी

भारत सरकारने बलुचिस्तान टाईम्स आणि बलुचिस्तान पोस्ट या न्यूज पोर्टलचे एक्स अकाउंट ब्लॉक केले आहेत. ही बंदी भारतात लागू करण्यात आली आहे.

भारताचा डिजिटल स्ट्राईक बलुचिस्तान टाईम्स आणि बलुचिस्तान पोस्ट न्यूज पोर्टलच्या x अकाउंट बंदी
PM Modi
Edited Image

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावादरम्यान, भारत सरकारने 2 न्यूज पोर्टलच्या एक्स-हँडलवर बंदी घातली आहे. भारत सरकारने बलुचिस्तान टाईम्स आणि बलुचिस्तान पोस्ट या न्यूज पोर्टलचे एक्स अकाउंट ब्लॉक केले आहेत. ही बंदी भारतात लागू करण्यात आली आहे. काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानविरुद्ध आक्रमक भूमिका घेत आहे. भारताने पाकिस्तानवर अनेक प्रकारचे निर्बंध लादले आहेत. 

दरम्यान, भारताच्या कारवाईने निराश झालेले पाकिस्तानचे नेते सतत भारताला धमक्या देत आहेत. परंतु भारताच्या कारवाईमुळे पाकिस्ताची घाबरगुंडी उडाली आहे. पाकिस्तानला भारत कधी हल्ला करील, याबाबत चींता लागली आहे. भारताने पाकिस्तानवर सर्व प्रकारच्या बंदी लादल्या आहेत. भारताच्या या निर्णयाचा मोठा फटका पाकिस्तानला सहन करावा लागणार आहे. 

हेही वाचा - पाकड्यांची गुर्मी काही कमी होईना!! 11 व्या दिवशीही नियंत्रण रेषेवर गोळीबार

इम्रान खान आणि बिलावल भुट्टो यांचे एक्स अकाउंट भारतात ब्लॉक - 

यापूर्वी भारताने पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी आणि माजी पाकिस्तान पंतप्रधान आणि पीटीआय संस्थापक इम्रान खान यांच्यावर कारवाई केली होती. या दोन्ही नेत्यांचे एक्स अकाउंट भारताने ब्लॉक केले होते. तथापि, त्यापूर्वी भारताने पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचे एक्स अकाउंट भारतात बंदी घातली होती. ख्वाजा आसिफ त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून सतत भारताविरुद्ध विष ओकत होता. त्याने भारतावर अणुहल्ला करण्याची धमकीही दिली.

हेही वाचा - अमृतसरमध्ये 2 ISI एजंटना अटक; लष्कराची गोपनीय माहिती लीक केल्याचा आरोप

तथापि, भारताने डॉन न्यूज, एआरवाय न्यूज, बोल न्यूज, रफ्तार, द पाकिस्तान रेफरन्स, जिओ न्यूज, सामा स्पोर्ट्स, इर्शाद भट्टी, जीएनएन, उजैर क्रिकेट, अमर चीमा एक्सक्लुझिव्ह, अस्मा शिराजी, मुनीब फारूख, सुनो न्यूज एचडी आणि रझी नामा यासारख्या काही प्रमुख पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी घातली होती. 
 


सम्बन्धित सामग्री