Sunday, August 17, 2025 05:15:17 PM

माझी कन्या भाग्यश्री योजना आहे तरी काय? जाणून घ्या पात्रता आणि फायदे

महाराष्ट्र सरकारने ‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ सुरू केली आहे. समाजात मुलींचा जन्मदर वाढवा तसेच त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळावी आणि त्यांना स्वावलंबी करता यावे, या उद्देशाने ही योजना राबवली जा

माझी कन्या भाग्यश्री योजना आहे तरी काय जाणून घ्या पात्रता आणि फायदे
माझी कन्या भाग्यश्री योजना आहे तरी काय? जाणून घ्या पात्रता आणि फायदे

मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ सुरू केली आहे. समाजात मुलींचा जन्मदर वाढवा तसेच त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळावी आणि त्यांना स्वावलंबी करता यावे, या उद्देशाने ही योजना राबवली जात आहे. विशेषतः दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांतील मुलींना याचा अधिक लाभ होतो. 

माझी कन्या भाग्यश्री योजनेमध्ये मुलींच्या जन्मापासून ते त्यांच्या उच्च शिक्षणापर्यंत आर्थिक मदत पुरवली जाते. ही योजना मुख्यतः पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांसाठी लागू आहे. मुलींच्या जन्मापासून ते १८ वर्षांचे होईपर्यंत एकूण १ लाख १ हजार रुपये अर्थसहाय्य म्हणून दिले जातात.

माझी कन्या भाग्यश्री योजनेत मुलींच्या जन्मानंतर पाच हजार रुपये दिले जातात. मुलगी पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये दिले जातात. सहावीत गेल्यावर सात हजार रुपये दिले जातात. मुलगी अकरावीत गेल्यावर ८००० रुपये दिले जातात. मुलीचे वय १८ पूर्ण झाल्यानंतर ७५००० रुपये दिले जातात. मुलींच्या उच्च शिक्षणासाठी हे पैसे दिले जातात.

हेही वाचा - Famous Indian Bussinesswomen: जाणून घ्या कोण आहेत भारतातील सर्वात श्रीमंत महिला उद्योजिका

माझी कन्या भाग्यश्री योजना ही सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत सुरु करण्यात आली आहे. या योजनेत अनेक अटी आहेत. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या मुली महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे. तसेच त्या लाभार्थांच्या पालकांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया आवश्यक आहे. यात अर्ज करणाऱ्या पालकांनी दोनपेक्षा जास्त मुलांना जन्म दिलेला नसावा. या योजनेचा फक्त दोन मुलींनाच लाभ मिळणार आहे. तसेच या योजनेत मुलींना १ लाखांचा अपघात विमा मिळणार आहे. पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांनाच या योजनेसाठी अर्ज करता येईल.

योजनेसाठी लागतील ही कागदपत्रे
या योजनेसाठी मुलीचे जन्म प्रमाणपत्र, आई-वडिलांचे आधार कार्ड, कुटुंबाचे रेशनकार्ड, बँक खाते तपशील आणि पासबुक प्रत, शिक्षण प्रमाणपत्रे शालेय प्रवेश घेतल्याचे प्रमाणपत्र, पासपोर्ट साइज फोटो या कागदपत्राची आवश्यकता आहे. 

हेही वाचा -  Jio Recharge Plans: 365 दिवसांच्या वैधतेसह जिओचे दोन प्लॅन; तुमच्यासाठी कोणता फायदेशीर?

असा अर्ज करावा?
योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज भरता येईल. अर्ज भरल्यानंतर तो तालुका महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात जमा करावा लागेल.
 


सम्बन्धित सामग्री