Friday, February 07, 2025 10:58:12 PM

Megablock on Sunday
लोकलच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

लोकलच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

मुंबई : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावरील पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल ते चर्चगेट अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

मध्य रेल्वे

माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी 11.05 ते दुपारी 3.555 पर्यंत हा मेगाब्लॉक राहणार आहे. या ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवर थांबून पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. ठाणे येथून अप धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा यादरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या सेवा मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे थांबतील. या सेवा गंतव्यस्थानी नियोजित वेळेच्या 15 मिनिटे उशिराने पोहोचतील.

 

हार्बर रेल्वे

पनवेल ते वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी 11.05 ते दुपारी 4.05 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक राहणार आहे. ब्लॉक कालावधीत पनवेल येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेल ते ठाणे ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरूळ आणि उरण स्थानकांदरम्यान सेवा उपलब्ध असेल. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशी यादरम्यान विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत.

हेही वाचा : संतोष देशमुख यांच्या हत्येचे पुणे कनेक्शन

पश्चिम रेल्वे

कुठे - चर्चगेट ते मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक राहणार आहे. ब्लॉक कालावधीत चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील सर्व सेवा जलद मार्गावर चालवल्या जातील. याशिवाय ब्लॉकदरम्यान काही उपनगरी गाड्या रद्द राहणार आहेत. चर्चगेटहून काही गाड्या वांद्रे/दादर स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट/शॉर्ट ओरिजनेट केल्या जातील.


सम्बन्धित सामग्री