मुंबई : राज ठाकरे २७ आणि २८ तारखेला विदर्भ दौरा करणार आहेत. अमरावतीत ११ जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ या पाच जिल्ह्यांचा २७ तारखेला घेणार आढावा असल्याची माहिती आहे. तसेच नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यांचा २८ तारखेला आढावा घेणार आहेत. राज २७ तारखेला सकाळी ७.३० ला अमरावतीत पोहचल्यानंतर मनसैनिक जोरदार स्वागत करणार आहेत.