मुंबई : महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदावरुन आणि जागावाटपावरुन तिढा निर्माण झाला आहे. तिढा सोडवण्यासाठी सातत्याने बैठका सुरू आहेत. मविआने १८, १९ आणि २० सप्टेंबर अशा सलग तीन दिवस बैठका घेतल्या. या बैठकांमध्ये मुख्यमंत्रिपदाबाबत आणि जागावाटपाबाबत चर्चा झाली. उद्धव जागा कमी घेऊ पण मुख्यमंत्रिपद हवे या भूमिकेवर ठाम आहेत. तर काँग्रेसने उद्धव यांच्या मागण्यांना दुर्लक्षून काँग्रेसच्या नेतृत्वात निवडणूक लढवावी अशी ठाम भूमिका घेतली आहे. सत्ता आली तर काँग्रेसच्या नेतृत्वात येईल आणि मुख्यमंत्री काँग्रेसचाच होईल, असे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले माध्यमांना सांगत आहेत. राशपच्या नेत्यांनी मातोश्रीवर जाऊन चर्चा केली आणि तिढा सोडवण्याचा प्रयत्न केला. पण काँग्रेसने मातोश्रीवर जाणे आणि उद्धवना भेटणे टाळले आहे. यामुळे उद्धव यांना कुणी कुणी ठोकारले पाहुयात आजच्या जेएमविशेषमध्ये...
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने जागा वाटपाच्या चर्चेला बुधवारी सुरुवात केली. तीनही पक्षांनी विभागवार आपले अहवाल बैठकीत मांडले. लोकसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला कोणत्या विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळाली होती. तसेच प्रत्येक मतदारसंघात तीन प्रमुख पक्षांकडून इच्छुक उमेदवार कोण आहेत यावर बैठकीत प्राथमिक चर्चा झाल्याचे समजते. कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाची ताकद जास्त आहे, तसेच कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येऊ शकतो हा निकष समोर ठेवून जागावाटप करण्यावर या बैठकीत चर्चा झाली....गुरुवारी झालेल्या बैठकीनंतर राशपचे नेते मातोश्रीवर आले मात्र काँग्रेसने मातोश्रीवर येणे टाळले ...यातून हेच स्पष्ट होते की आता काँग्रेसला शिउबाठाचे मुख्यमंत्रीपद मान्य नाही....
विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने महाविकास आघाडीने बैठकांचा धडाका लावलाय... तर जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा सुरु असतानाच महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरु आहे...... त्यातच बिहार मॉडेलनुसार मुख्यमंत्रिपद देण्याचा प्रस्ताव शिउबाठाने मांडलाय... हा प्रस्ताव काय आहे ? जाणून घेऊ..
ठाकरेंकडून जागावाटपाचा नवा प्रस्ताव ?
काँग्रेस - १०५ जागा लढवेल
शिउबाठा - ९५ जागा लढवेल
राशप - ८८ जागा लढवेल
काँग्रेसचा शिउबाठाला अधिक जागा देण्याला आणि उद्धव यांच्या मुख्यमंत्रीपदाला कडाडून विरोध आहे....महाविकास आघाडीच्या बैठकीत काँग्रेसकडून १२५ जागांची मागणी करण्यात आलीय.....काँग्रेसने राज्यात लोकसभेत जी कामगिरी केली त्यानुसार काँग्रेस जास्त जागांची मागणी करणार हे निश्चितच होते.... दुसऱ्या बाजूला लोकसभेत मविआत सर्वाधिक जागा शिउबाठाने लढून सर्वात निराशाजनक कामगिरी केली....त्यामुळे काँग्रेसला शिउबाठाला ठोकारण्याचे एक ठोस कारणही मिळाले....
मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव यांनी दिल्ली गाठली होती. पण काँग्रेस मुख्यमंत्रिपद शिउबाठाला देण्यास अनुत्सुक आहे. काँग्रेसचा अहंकार कुरवाळूनही त्यांनी उद्धव यांच्या मुख्यमंत्रिपदासाठी होकार दिला नाही.... शरद पवारांनी तर उद्धव यांची खिल्लीच उडवली.....
दिल्ली दौऱ्यात उद्धव यांनी काय केले ?
- उद्धव यांनी काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांशी भांडण मिटवले.
- सांगली पराभवामुळे दुखावलेल्यांची मनधरणी केली.
- शरद पवारांकडे स्वतःच्या मुख्यमंत्री पदाची इच्छा सुचवून पाहिली.
- राहुल गांधींच्या घरी जाऊन गांधींचा अहंकार कुरवाळला.
- सोनिया गांधी यांच्या तब्येतीची विचारपूस केली. संवाद सुधारला.
- खर्गे आणि वेणुगोपाल हे मुख्यमंत्री पदाच्या वाटेतले काटे दूर करण्याची खेळी खेळली.
काय म्हणाले शरद पवार ?
मविआत विधानसभेत जो पक्ष जास्त जागा जिंकेल त्याचाच मुख्यमंत्री असेल असे अलिकडेच शरद पवार म्हणाले.
काय म्हणाले संजय राऊत आणि बाळासाहेब थोरात ?
संजय राउतांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापलंय...मित्रपक्षांना राऊतांनी दम भरलाय....महाराष्ट्रात सत्ता होती मात्र मुख्यमंत्रिपद नव्हते...या काँग्रेसच्या भळभळत्या जखमेवर राऊतांनी मीठ चोळलंय. तर शिउबाठाने कितीही हट्ट करु देत मुख्यमंत्री तर काँग्रेसचाच होणार असाच काहीसा पवित्रा काँग्रेस नेत्यानी घेतल्याचे बघायला मिळतेय....काँग्रेस नेता बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री हा काँग्रेसचाच होणार असं म्हटंलयं. उद्धव मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवण्याची मागणी करत आहेत. तर शरद पवारांनी ही मागणी जाहीररित्या फेटाळली आहे.
आधी निवडणूक जिंका, मुख्यमंत्री पदाचं नंतर बघू - पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस, माजी मुख्यमंत्री
काँग्रेसची अधिकृत भूमिका
- निवडणूक जिंकण्यावर लक्ष द्या.
- योग्य उमेदवार द्या.
- मुख्यमंत्री पदाची चर्चा इतक्यात नको.
- निवडणूक जिंकली तर मुख्यमंत्री पद.
- मविआत ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री
- काँग्रेसने लोकसभेला महाराष्ट्रात ४८ पैकी १७ जागा लढवल्या
- काँग्रेसला १७ पैकी १३ जागांवर यश
- शिउबाठाने मविआत सर्वाधिक म्हणजे २१ जागा लढवल्या
- शिउबाठाला २१ पैकी अवघ्या ९ जागा जिंकता आल्या
- मविआत सर्वात कमी दहा जागा राशपने लढवल्या
- राशपचा १० पैकी ८ जागांवर विजय
- महाविकास आघाडीने राज्यात ४८ पैकी ३० जागा जिंकल्या
- सांगलीतील अपक्ष खासदार विशाल पाटीलही मविआच्या सोबत
उद्धव यांची केविलवाणी परिस्थिती
उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या वादातून जन्माला आलेली ही महाविकास आघाडी पुन्हा उद्धव ठाकरेंच्याच मुख्यमंत्रिपदाच्या हट्टामुळे तुटणार अशी काहीशी परिस्थिती आता मविआत निर्माण झाली आहे.....
जोपर्यंत निवडणुकांचे निकाल लागत नाहीत तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करणार नाही असा निर्धारच काँग्रेसने केलाय...तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव यांचा हट्ट सुरु....उद्धव यांनी हा हट्ट सोडला नाही तर केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणुका लढतील अशीही तयारी झाल्याची माहिती आहे.....त्यामुळे मुख्यमंत्रीपद तर सोडाच पण जागाही मनासारख्या मिळणार नाही अशी केविलवाणी परिस्थिती उद्धव यांची मविआत झाल्याचे दिसतेय......
मित्रपक्ष तर जागावाटप आणि मुख्यमंत्रिपदावरून उद्धव यांना ठोकारत आहेतच पण आता शिउबाठाचे खासदार संजय राऊतांची भूमिकाही बदलली आहे....एरवी मुख्यमंत्रिपदासाठी जोर लावणारे...आक्रमक असणारे संजय राउत अचानकच मवाळ भाषा करायला लागलेत....उद्धव ठाकरे तेव्हा मुख्यमंत्री झाले ती तेव्हाची गरज होती असं ते म्हणाले....याचाच दुसरा अर्थ असा काढावा का की आता उद्धव यांच्या मुख्यमंत्रिपदाची गरज नाही ?
कोण आहेत काँग्रेसमधले मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार पाहुयात.....
- पृथ्वीराज चव्हाण नाना पटोले
- बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार
- मुकुल वासनिक अमित देशमुख
- यशोमती ठाकूर वर्षा गायकवाड
- प्रणिती शिंदे रजनी पाटील
उद्धवना का हवंय मुख्यमंत्रीपद ?
- अपमानाचा बदला घेण्यासाठी
- अडीच वर्षाचा उरलेला कालावधी भरण्यासाठी
- राजकीय वारसाची सोय लावण्यासाठी
- शिवसैनिकांना दिलासा देण्यासाठी
- संघटना बळकट करण्यासाठी
काँग्रेसचा उद्धवना विरोध का ?
- मेहनत काँग्रेसची, लाभ ठाकरेंना हे धोरण अमान्य
- मुख्यमंत्री असताना काँग्रेसचा ठाकरेंकडून सतत अपमान
- मुख्यमंत्री झाल्यास ठाकरे हे पवारांच्या हातातील बाहुलं बनतील
- पटोलेंचे ठाकरेंवर व्यक्तिगत खुन्नस
- गांधींना केंद्रात बळकट होण्यासाठी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद हवंय