नवी मुंबई : बहुचर्चित नवी मुंबई विमानतळावर रविवारी दुपारी पहिल्या व्यावसायिक विमानाचं यशस्वीरित्या लँडिग झालं आहे. A-320 हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमान विमानतळावर उतरलं असून पुढील वर्षात नवी मुंबईकरांना त्यांच्या हक्काचं विमानतळ मिळणार आहे. 17 एप्रिल 2025 मध्ये येथील प्रवासी आणि कार्गो विमानसेवा पूर्णपणे कार्यान्वित होणार आहे. हे देशातील युनिक विमानतळ असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
नवी मुंबई विमानतळाची वैशिष्ट्ये
नवी मुंबई विमानतळावर व्यावसायिक प्रवासी विमानाचे यशस्वी लँडिंग
मार्च 2025 पासून नवी मुंबई विमानतळ कार्यन्वित होणार
मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भार कमी होणार
नवीन मुंबईतील विमानतळ देशातील सर्वात दुसरे मोठं विमानतळ
या विमानतळाचा रनवे 3.7 किमी इतका लांब असणार
या विमानतळावर एकाचवेळी 350 विमाने उभी राहणार
येथून एका वर्षाला 9 कोटींहून अधिक प्रवासी प्रवास करू शकणार
सुरूवातीला 60 लाखांच्या आसपास प्रवासी वर्षाला प्रवास करणार
मुंबईपासून 40 किलोमीटर अंतरावरील पनवेलजवळ 1,160 हेक्टर परिसरात विमानतळ बांधण्यात आलंय
या विमानतळाला मेट्रो, लोकल,बस आणि वॉटर टॅक्सीसोबत जोडले जाणार
11 ऑक्टोबर रोजी नवी मुंबई विमानतळावर पहिले हवाई दलाचे लढाऊ विमान उतरवले होते
सुरूवातील देशांतर्गत आणि नंतर आंतरराष्ट्रीय सेवा येथून सुरू होणार
महाराष्ट्र सरकारने जुलै 2008 मध्ये विमानतळाच्या बांधकामास मान्यता दिली होती
नवी मुंबई विमानतळ 2032 पर्यंत 4 टप्प्यात बांधून पूर्ण होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये भूमिपूजन केले होते
हा प्रकल्प डीबीएफओटी अंतर्गत सार्वजनिक-खाजगी भागीदारीद्वारे कार्यान्वित केला जातोय
नवी मुंबई विमानतळ महाराष्ट्राचे ग्रोथ इंजिन ठरणार आहे
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा रनवे, सिग्नल यंत्रणा अशी सर्व महत्वाची कामे पूर्ण झाली असून विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आहे. महिन्याभरापूर्वीच लष्कराच्या विमानाचे यशस्वी लँडिंग चाचणी करण्यात आली होती. त्यामुळे आता थेट व्यावसायिक प्रवासी विमानाचे लँडिंग करण्यात आले. ही चाचणी यशस्वी झाली असल्याने आता पुढील कामे तातडीने पूर्ण करण्याचे आव्हान आहे.
नवी मुंबई विमानतळ नव्या वर्षात एप्रिल महिन्यात सुरू होईल. टप्प्याटप्प्याने या विमानतळावरून वर्षाला तब्बल 2 कोटी प्रवाशांची ये-जा सुरू होणार असून त्याची एकूण क्षमता वार्षिक 9 कोटी प्रवासी आणि 8 दशलक्ष टन मालवाहतूक होणार आहे. हे विमानतळ जागतिक दर्जांच्या सोयी-सुविधांयुक्त असणार आहे.
नवी मुंबईकरांना नव्या वर्षांत हे गिफ्ट मिळणार असल्यानं विमानाच्या यशस्वी लँडिंगनंतर त्यांचा आनंदही द्विगुणीत झाला आहे.
हेही वाचा : गुलाबी थंडी अनुभवण्यासाठी पर्यटकांची ‘या’ ठिकाणाला पसंती
नवी मुंबई विमानतळाला सुरूवातीला विरोधक आणि स्थानिकांनी मोठा विरोध केला होता. तसेच त्याला कोणाचे नाव द्यावे यावरूनही स्थानिकांनी मोठं आंदोलन उभारलं होतं. अशा अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत आता हे विमानतळ पूर्णत्वास येणार आहे. हे विमानतळ खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या गतिमान विकासाचं ग्रोथ इंजिन ठरणार आहे.