पुणे : (Pune) पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शहरातील सुरु असलेल्या मेट्रोच्या विस्तारीकरणाला सध्या वेगा आलेला आहे. वनाज ते चांदणी चौक या दरम्यान मेट्रोच्या पुढील टप्प्याचे काम नुकतेच सुरु झाले आहे. यामुळे चांदणी चौक ते कोथरुड या मार्गावर वाहतुकीत मोठा बदल करण्यात आलेला आहे.
ही महत्त्वाची अपडेट चुकवू नका
मेट्रोच्या या कामासाठी रस्त्याच्या नेमक्या मध्यभागी दुभाजकावर दोन्ही बाजूने लोखंडी बॉरिकेड्स लावण्यात येत आहे. शिवाय सुरक्षेच्या कारणामुळेच या बॅरिकेडिंगचे काम वेगाने सुरु आहे. याच कामामुळे प्रमुख रस्ता असलेल्या चांदणी चौकातून थेट कोथरुड डेपोकडे जाणाऱ्या उताराच्या रस्त्यावर जड वाहनांना धोका निर्माण होऊ शकतो, म्हणूनच या मार्गावर जड वाहनांसह एसटी तसेच खासगी बसेसना प्रवेश बंदी असणार आहे. शिवाय प्रथमेश एलिट सोसायटीसमोर हाइट बॅरिअर बसवले जाणाक आहे. त्यामुळे डंपर, मिस्कर, मोठे ट्रक , प्रवासी बससेवा याना थेट कोथरुडकडे जाता येणार नाही, अशी माहिती समोर आलेली आहे.
पर्यायी मार्ग कोणता?
मिळालेल्या माहितीनुसार, वाहनचालकांना चांदणी चौकातून कोथरुडला जायचे असल्यास त्यांनी चांदणी चौक- डुक्कर खिंड- वारजे-कर्वेनगर, कर्वे रस्ता-पौड फाटा या पर्यायी मार्गाचा वापर करावा. दरम्यान, स्वारगेट ते कात्रज या दरम्यान भूमिगत मेट्रोचे काम सुरु असल्याने सातारा रस्ता आणि मार्केट यार्ड या परिसरातमध्येही वाहतूक वळवण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.