Monday, February 17, 2025 01:00:22 PM

IPL 2025 Punjab Kings Captain
श्रेयस अय्यर पंजाब किंग्जचा नवा कर्णधार !

पंजाब किंग्स (Punjab Kings) संघ २००८ पासून आयपीएलमध्ये (IPL) भाग घेत आहे, परंतु संघाला एकदाही विजेतेपद मिळवता आलेले नाही.

श्रेयस अय्यर पंजाब किंग्जचा नवा कर्णधार

मुंबई: पंजाब किंग्स (Punjab Kings) संघ २००८ पासून आयपीएलमध्ये (IPL) भाग घेत आहे, परंतु संघाला एकदाही विजेतेपद मिळवता आलेले नाही. यावेळी आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात ट्रॉफी जिंकण्यासाठी पंजाब किंग्जने श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) २६.७५ कोटी रुपयांना विकत घेतले आणि तेव्हाच तो पंजाबचा कर्णधार होणार हे स्पष्ट झाले होते. श्रेयस अय्यर, युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि शशांक सिंग (Shashank Singh) हे सलमान खान (Salman Khan) होस्ट करत असलेल्या बिग बॉस-१८ (Bigg Boss 18) या शोमध्ये पाहुणे म्हणून आले होते. जिथे सलमान खानने पुष्टी केली की अय्यर पंजाब किंग्जचा कर्णधार असेल. यानंतर पंजाब संघाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून श्रेयस अय्यरची कर्णधार म्हणून घोषणा केली. 

कर्णधारपद मिळाल्यानंतर श्रेयस अय्यर म्हणाला की, "संघाने माझ्यावर विश्वास व्यक्त केला याचा मला सन्मान वाटतो. मी पुन्हा प्रशिक्षक रिकी पाँटिंगसोबत (Ricky Ponting) काम करण्यास उत्सुक आहे. स्वत:ला सिद्ध करणाऱ्या आणि चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंसह संघ मजबूत दिसत आहे. मला आशा आहे की आमचे पहिले विजेतेपद जिंकण्यासाठी व्यवस्थापनाने दाखवलेला विश्वास आम्ही कायम राखू शकू." 

श्रेयस अय्यरकडे पूर्वीचा कर्णधारपदाचा अनुभव आहे आणि तो गोलंदाजीतही खूप बदल करतो. त्याच्या नेतृत्वाखालीच कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाने गेल्या मोसमात विजेतेपद पटकावले होते. मात्र त्यानंतरही त्याला केकेआर संघाने कायम ठेवले नाही. केकेआर संघापूर्वी अय्यरने दिल्ली कॅपिटल्सचे (Delhi Capitals) कर्णधारपदही सांभाळले होते आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली दिल्ली संघाने आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. श्रेयसने आतापर्यंत ७० आयपीएल सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे, ज्यामध्ये त्याने ३८ सामने जिंकले आहेत आणि २९ सामने गमावले आहेत. अय्यर हा पहिला आयपीएल कर्णधार आहे ज्याने आपल्या नेतृत्वाखाली दोन संघांना (दिल्ली कॅपिटल्स आणि केकेआर) अंतिम फेरीत नेले आहे. 

'>http://
 

'>http://


Live TV