Sunday, August 17, 2025 05:23:00 PM

डॉक्टरने तरूणावर केला कोयत्याने हल्ला

पुण्यातील वाघोलीत एक धक्कादायक घटना घडली आहे.

डॉक्टरने तरूणावर केला कोयत्याने हल्ला

पुणे : पुण्यातील वाघोलीत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका डॉक्टरने तरूणावर कोयत्याने हल्ला केला आहे. डॉक्टरांकडून तरुणाने व्याजाने घेतलेले पैसे वेळेत परत न केल्याने डॉक्टरसह गुंडांनी मिळून तरुणावर कोयत्याने वार केला. जीवन रक्षक दवाखान्याचे डॉक्टर आणि त्याच्या इतर दोन साथीदार गुंड्यांनी मिळून तरूणावर जीवघेणा हल्ला केला.

या प्रकरणी पुण्यातील वाघोली येथील लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात एका डॉक्टरने कोयता केललेल्या हल्ल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. डॉक्टर लोकांचा जीव वाचवून त्यांना वरदान देतात. इथे एका डॉक्टरनेच एका जीवाचा प्राण घेण्याचा प्रयत्न केला आहे. हे अत्यंत क्रूर आहे.

              

सम्बन्धित सामग्री