अमरावती : उद्धव ठाकरे यांनी प्रचारसभा घेतली, ज्यामध्ये त्यांनी महायुती सरकारवर गंभीर आरोप केले. उद्धव ठाकरे म्हणाले, "महायुतीचं सरकार महाराष्ट्रद्रोही आहे आणि गद्दारी करुन आपलं सरकार पाडलं." शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर देखील जोरदार टीका केली. ते म्हणाले, "सत्ता हातात आली आणि त्यांच्या डोक्यात हवा गेली. महाराष्ट्राच्या मातीशी त्यांनी गद्दारी केली."
उद्धव ठाकरे यांनी गजानन लाटके यांच्यासाठी सभा घेतली असून, त्यांनी स्पष्टपणे सांगितले, "आम्ही जे करतो ते महाराष्ट्राच्या हिताचं आहे." उद्धव ठाकरे यांनी एका शब्दात सांगितले की, "आपण सगळे भाऊ-भाऊ, महाराष्ट्र मिळून खाऊ." असा उपरोधिक टोला महायुतीला लगावला. यावेळी उद्धव यांनी महाविकास आघाडीच्या एकतेवर जोर देत "महाराष्ट्राला वाचवायला आम्ही एकत्र आलो" असे देखील म्हटले.