मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीच वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या आहेत. या दोन याद्यांमधून 'वंचित'ने एकूण २१ उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. 'वंचित'ची ताजी यादी मंगळवार ९ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रसिद्ध झाली. याआधी शनिवार २१ सप्टेंबर २०२४ रोजी 'वंचित'ची पहिली यादी प्रसिद्ध झाली. 'वंचित'च्या मंगळवारी जाहीर झालेल्या यादीत दहा मुसलमान उमेदवारांची नावं आहेत. याआधी जाहीर झालेल्या 'वंचित'च्या पहिल्या यादीत अकरा उमेदारांचा समावेश आहे. यात तृतीयपंथी उमेदवाराचाही समावेश आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघातून शमिभा पाटील या तृतीयपंथी व्यक्तीस उमेदवारी देण्यात आल्याचा उल्लेख पहिल्या यादीत आहे. तसेच सिंदखेड राजामधून वंजारी असलेल्या सविता मुंडे यांना उमेदवारी देण्यात आल्याचा उल्लेख पहिल्या यादीत आहे.
'वंचित'ची दुसरी यादी
- मलकापूर विधानसभा - शहेजाद खान सलीम खान
- बाळापूर विधानसभा - खतीब सैय्यद नातीकोद्दीन
- परभणी विधानसभा - सय्यद समी सय्यद साहेबजान
- औरंगाबाद मध्य विधानसभा - मो. जावेद मो. इसाक
- गंगापूर विधानसभा - सय्यद गुलाम नबी सय्यद गफुर
- कल्याण पश्चिम विधानसभा - अयाज गुलजार मोलवी
- हडपसर विधानसभा - अॅड. मोहम्मद अफरोज मुल्ला
- माण विधानसभा - इम्तियाज जाफर नदाफ
- शिरोळ विधानसभा - आरिफ मोहम्मद अली पटेल
- सांगली विधानसभा - आल्लाउद्दीन हयातचाँद काजी
'वंचित'ची पहिली यादी
- रावेर विधानसभा (जळगाव) - शमिभा पाटील
- सिंदखेड राजा विधानसभा (बुलडाणा) - सविता मुंडे
- वाशिम विधानसभा - मेघा किरण डोंगरे
- धामणगाव रेल्वे विधानसभा (अमरावती) - निलेश टी. विश्वकर्मा
- नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा - विनय भांगे
- साकोली विधानसभा (भंडारा) - डॉ. अविनाश नान्हे
- नांदेड दक्षिण विधानसभा - फारुख अहमद
- लोहा विधानसभा (नांदेड) - शिवा नरांगळे
- औरंगाबाद पूर्व विधानसभा - विकास रावसाहेब दांडगे
- शेवगाव विधानसभा (अहमदनगर) - किसन चव्हाण
- खानापूर विधानसभा (सांगली) - संग्राम माने