Sunday, August 17, 2025 05:11:49 PM

देशमुख हत्येप्रकरणी आरोपी विष्णू चाटेने दिली मोठी कबुली

बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.

देशमुख हत्येप्रकरणी आरोपी विष्णू चाटेने दिली मोठी कबुली

बीड : बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी विष्णू चाटे याने खंडणी मागितल्याची कबुली दिली आहे अशी पोलीस सूत्रांची माहिती आहे. देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. वाल्मिक कराड यांच्या विष्णू चाटे हा देखील पोलिसांच्या ताब्यात आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून करण्यात येत आहे.

 

हेही वाचा : वाल्मिक कराडची न्यायालयाकडे याचिका; स्लिप एपनिया आजार असल्याचा केला दावा

 

बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडसह पोलीस कोठडीत असलेला त्याचा साथीदार विष्णू चाटे याने काल पोलिसांजवळ मोठी कबुली दिल्याची माहिती आहे. पवनचक्की कंपनीकडे दोन कोटी खंडणी मागितली असल्याची कबुली चाटे यानं दिल्यानं आता वाल्मिक कराडच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होणार आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

 

वाल्मिक कराड यानेच पवनचक्कीच्या अधिकाऱ्यांसोबत फोनवर संभाषण केलं. वाल्मिक कराड याने पवनचक्कीच्या अधिकाऱ्यांना धमकी दिली. त्यासाठी त्याने चाटेचा मोबाईल फोन वापरला आणि पवनचक्कीच्या अधिकाऱ्यांना फोन करून खंडणीची धमकी दिल्याची माहिती चाटे याने चौकशीत दिली असं स्थानिक पोलीस सूत्रांनी सांगितलं आहे.  वाल्मिक कराड याने पवनचक्की अधिकाऱ्यांना दोन कोटी खंडणी मागितल्याची मोठी कबुली कराडचा साथीदार विष्णू चाटे याने पोलिसांना दिली.

मस्साजोग सरपंच हत्येप्रकरणी वाल्मिक कराडवर आरोप होत आहेत. पुण्यात 31 डिसेंबर 2024 रोजी कराड याने सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केले. त्या दिवशी रात्री न्यायालयाने त्याला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर पोलिसांनाकडून कराडची कसून चौकशी करण्यात येत आहे.


सम्बन्धित सामग्री