नवी दिल्ली: अलिकडच्या काळामध्ये देशभरात हिट अँड रनच्या घटना वाढल्या आहेत. हिट अँड रन प्रकरणात आरोपीवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 281 (निष्काळजीपणे वाहन चालवणे) आणि कलम 105 अंतर्गत आरोपींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. जर पोलिसांनी एखाद्या अपघातात चालकावर हिट अँड रनचे कलम लावले तर आरोपीला किती शिक्षा होऊ शकते? ते जाणून घेऊयात.
शिक्षेचे नियम अधिक कडक -
भारतात हिट अँड रनसारख्या प्रकरणांमध्ये शिक्षेची तरतूद भारतीय दंड संहिता (IPC), भारतीय न्याय संहिता (BNS) आणि मोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत करण्यात आली आहे. यापूर्वी, भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलमांखाली गुन्हे नोंदवले जात होते आणि शिक्षा दिली जात होती, परंतु जुलै 2023 पासून लागू होणाऱ्या भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलमांखाली, हिट अँड रनसाठीचे कलम बदलले आहेत. तसेच शिक्षेचे नियम अधिक कडक झाले आहेत. हिट अँड रन प्रकरणात, पीडितेला दुखापत, गंभीर दुखापत किंवा मृत्यूच्या आधारावर शिक्षा निश्चित केली जाते. जर चालकाने धडक देऊन धाव घेतली तर शिक्षा देताना हा पैलू देखील विचारात घेतला जातो.
हेही वाचा - संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मोदी सरकार मांडणार 'ही' विधेयके
हिट अँड रन प्रकरणात कोणती शिक्षा होते?
खरं तर जेव्हा अपघातानंतर चालक थांबत नाही किंवा पीडित व्यक्तीला मदत करत नाही किंवा पोलिसांना याबाबत माहिती देत नाही, असे प्रकरण हिट अँड रनमध्ये मोडली जातात. भारतात, हिट अँड रन प्रकरणात पीडित व्यक्तीचा मृत्यू झाला तर 7 ते 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. दुखापत झाल्यास 6 महिन्यांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. दंड आणि परवाना रद्द करण्याची शिक्षा देखील दिली जाऊ शकते, परंतु शिक्षा अपघाताच्या परिणामावर, चालकाच्या निष्काळजीपणावर आणि पुराव्यावर अवलंबून असेल.
दरम्यान, आता भारतीय न्याय संहिता (BNS) मध्ये, कलम 106 अंतर्गत हिट अँड रन प्रकरणासाठी कडक नियमांची तरतूद करण्यात आली आहे. जर निष्काळजीपणे गाडी चालवली गेली आणि धडकेमुळे एखाद्याचा मृत्यू झाला, परंतु धडक देऊन पळून जाण्याऐवजी, व्यक्तीने पोलिसांना माहिती दिली, तर कलम 106 (1) अंतर्गत गुन्हा दाखल केला जातो. या परिस्थितीत, 5 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंड देखील होऊ शकतो. जर धडक देणारा घटनास्थळावरून पळून गेला तर कलम 106 (2) लागू होईल. या कलमाअंतर्गत, 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो.
हेही वाचा - मोठी बातमी! उत्तराखंडच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गिरवण्यात येणार भगवद्गीता आणि रामायणाचे धडे
मोटार वाहन कायद्याअंतर्गत होऊ शकते शिक्षा -
याशिवाय, मोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत देखील, हिट अँड रन प्रकरणांमध्ये कलमे जोडली जातात आणि कायद्याच्या कलमांखाली विहित शिक्षा दिली जाते. जर कायद्याच्या कलम 184 मध्ये धोकादायक वाहन चालवल्याबद्दल शिक्षा दिली गेली असेल, तर शिक्षा 6 महिने तुरुंगवास किंवा 1 हजार रुपये दंड किंवा दोन्ही असू शकते. तसेच दारू पिऊन गाडी चालवली असेल तर कलम 185 लावण्यात येते. जर हिट अँड रन प्रकरणात कायद्याचे कलम 161 जोडले गेले तर मृत्यू किंवा गंभीर दुखापत झाल्यास पीडितेला भरपाई दिली जाते.