बारामती : बारामतीतील नागरिकांना मूलभूत सुविधा न मिळाल्याने खासदार सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांनी बारामती नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले. बारामतीत मोठ्या प्रमाणात डेंग्यूची साथ फैलावत आहे, परंतु नगरपालिका डेंग्यू रोखण्यासाठी योग्य उपाययोजना करत नसल्याचा आरोप आहे.
सुप्रिया सुळे आणि माजी नगरसेवकांनी धुराळणीच्या मशीनचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी सांगितले की, नगरसेवकांनी स्वतः नगरपालिकेला धुराळणीच्या मशिन्स दिल्या होत्या, परंतु त्या मशिन्स चोरीला गेल्याचा आरोप अधिकाऱ्यांनी केला. उपस्थित नगरसेवकांनी हे आरोप फेटाळत विचारले की, या मशिन्स नेमक्या कुठे गेल्या ? या प्रश्नावर मुख्याधिकारी उत्तर देऊ शकले नाहीत. सुप्रिया सुळे यांनी या सर्व प्रश्नांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. यावेळी त्यांनी डेंग्यूसारख्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाला जबाबदारीने वागण्याचे आवाहन केले.