Sunday, August 17, 2025 06:00:57 AM

कडक उन्हापासून सुटका हवीय? 'ही' थंड ठिकाणं आहेत एकदम खास

उन्हाळ्यात थंड ठिकाणी फिरायला जाण्यासारखी देशात अनेक ठिकाणी आहेत. ती ठिकाणी कोणती आहेत, हे पाहुयात...

कडक उन्हापासून सुटका हवीय ही थंड ठिकाणं आहेत एकदम खास
कडक उन्हापासून सुटका हवीय? 'ही' थंड ठिकाणं आहेत एकदम खास

एप्रिल महिना सुरू झाला आणि उन्हाचे चटके तीव्र होऊ लागले आहेत. सध्या वातावरण कोरडे असल्याने कमाल आणि किमान तापमानातही दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा वातावरणात विकेंडला थंड ठिकाणी फिरायला जाण्यासारखी देशात अनेक ठिकाणी आहेत. जिथं हिरवळ, गार वारे आणि निसर्गाची साथ तुम्हाला नवचैतन्य देतील. चला तर मग, ती ठिकाणी कोणती आहेत, हे पाहुयात...

मसुरी (उत्तराखंड)

दिल्लीपासून फक्त 290 किमी अंतरावर असलेली मसुरी ही टेकड्यांची राणी म्हणून प्रसिद्ध आहे. येथे केम्प्टी फॉल्सचा थंड शॉवर, गन हिलवरून दिसणारे सुंदर दृश्य, मॉल रोडवरची रंगतदार गर्दी आणि ढगांच्या सहवासात गार वातावरण मिळतं. मसुरी हे फक्त एक पर्यटनस्थळ नाही तर डोंगरात हरवून जाण्याचा अनुभव आहे.

 

भीमताल (उत्तराखंड)

नैनितालच्या जवळ असलेलं भीमताल हे दिल्लीपासून सुमारे 280 किमी अंतरावर आहे. येथे बोटिंग, कायाकिंग, ट्रेकिंग आणि निसर्गाच्या सहवासात निवांत वेळ घालवण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे. गर्दीपासून दूर राहून शांत वेळ हवी असेल तर भीमताल परफेक्ट डेस्टिनेशन आहे.

 

लॅन्सडाउन (उत्तराखडं)

दिल्लीपासून सुमारे 250 किमीवर असलेलं लॅन्सडाउन हे अजूनही पर्यटकांपासून काहीसं माहित नसलेलं हिल स्टेशन आहे. येथे पाइनच्या झाडांची गर्दी, थंड वाऱ्याची झुळूक आणि भुल्ला तलावातली बोटिंग मन प्रसन्न करतं. गढवाल रायफल्सचं संग्रहालय आणि सेंट मेरी चर्च यामुळं इथे इतिहासाची माहिती होते. 

हेही वाचा -  Cucumber Pickle Recipe: काकडीपासून लोणचे कसे बनवायचे तुम्हाला माहिती आहे का?

कसौली (हिमाचल प्रदेश)

दिल्लीपासून 300 किमी अंतरावर असलेलं कसौली हे हिमाचलमधील एक छोटंसं पण सुंदर ठिकाण आहे. येथे गिल्बर्ट ट्रेलवर चालत निसर्ग अनुभवता येतो. तसंच मंकी पॉईंटवरून शहराचं विहंगम दृश्य दिसतं. थंडी, शांतता आणि निसर्ग यांचा परिपूर्ण संगम कसौलीला खास बनवतो.

हेही वाचा -  Home Decoration Tips : घराचं डेकोरेशन तर करायचंय.. पण जास्त खर्च परवडणार नाही? अशी करा आपल्या बजेटमधली सजावट

 

चैल (हिमाचल प्रदेश)

हिमाचलमधील चैल हे ठिकाण शिमल्यापासून 45 किलोमीटर दूर आहे. पण सौंदर्यात तितकंच भारी हे ठिकाण आहे. जगातील सर्वात उंच क्रिकेट मैदान, चैल पॅलेस आणि नाईट स्काय गाझिंगचा अनुभव यामुळे चैल खास ठिकाण ठरतो. दिल्लीपासून फक्त 330 किमीवर असलेलं हे ठिकाण उन्हाळ्यात गारवा देणारं मस्त ठिकाण आहे.


सम्बन्धित सामग्री