Thursday, July 17, 2025 02:25:24 AM

Dates Benefits: एक आठवडा नियमित खजूर खाल्ल्याने काय होतं?

वेगवेगळ्या ड्राय फ्रूट्सचे आरोग्याला किती फायदे होतात हे सगळ्यांनाच माहिती आहे. बदाम, काजू, अक्रोड यासोबतच खजूरही खूप महत्वाचं आहे. खजूर खाण्याने शरीराला अनेक फायदे मिळतात.

dates benefits एक आठवडा नियमित खजूर खाल्ल्याने काय होतं

मुंबई: वेगवेगळ्या ड्राय फ्रूट्सचे आरोग्याला किती फायदे होतात हे सगळ्यांनाच माहिती आहे. बदाम, काजू, अक्रोड यासोबतच खजूरही खूप महत्वाचं आहे. खजूर खाण्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. आयुर्वेदानुसार खजूर थंड असतं आणि पित्ताची समस्या दूर करण्यासाठी त्याने खूप फायदा मिळतो. सोबत शरीराला इतरही अनेक फायदे मिळतात. पण ते खाण्याची योग्य पद्धत अनेकांना माहित नसते. 

खजूरामध्ये फायबर, आयर्न, कॅल्शियम, व्हिटॅमिन आणि मॅग्नेशिअम भरपूर प्रमाणात असतात. तसेच यात व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डी सारखे पोषक तत्व असतात. यात अ‍ॅंटी ऑक्सिडेंटही असतात. त्याशिवाय यात पोटॅशिअम, फॉस्फोरस, मॅग्नेशिअम सारखे पोषक तत्वही असतात.

जर तुम्हाला खजूरातून जास्त फायदा मिळवायचा असेल तर तुम्ही ते भिजवून खाल्ले पाहिजे. चला तर जाणून घेऊयात खजूर खाण्याचे फायदे...

हेही वाचा: Sawan 2025: अमरनाथ शिवलिंग कधी तयार होते आणि त्याचा चंद्राशी काय संबंध आहे?

भिजवलेले खजूर खाण्याचे फायदे


बद्धकोष्ठता दूर होते
हृदयासाठी चांगले
कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत
हाडे मजबूत होतात
ब्लड प्रेशर कंट्रोल होते
पुरूष आणि महिलांची लैंगिक क्षमता वाढवते
मेंदूसाठी फायदेशीर
कमजोरी दूर होते
रक्ताची कमतरता दूर होते
सूज कमी करतात
त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर

रिकाम्या पोटी खजूर खाण्याचे फायदे

वजन होईल कमी

सकाळी रिकाम्या पोटी खजूर खाल्ल्याने तुमचं वाढलेलं वजन कमी होतं. अशात ज्यांना वजन कमी करायचं आहे. त्यांनी झोपेतून उठल्यावर खजूर खावे. याने बराच वेळ पोट भरलेलं राहतं. अशात तुम्ही अनावश्यक खाणं टाळू शकता.

एनर्जी वाढेल
जर तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी खजूर खाल तर शरीरात दिवसभर एनर्जी कायम राहते. यात लोह भरपूर असतं. ज्यामुळे शरीरात हिमोग्लोबिनची पातळी वाढते. तसेच तुमच्यात भरपूर एनर्जी राहते.

हेही वाचा: गद्दार कुणाला बोलतो? बाहेर ये तुला दाखवतो; परबांच्या आरोपावर काय म्हणाले शंभूराज देसाई?

डायजेशन मजबूत होईल 
ज्या लोकांना नेहमीच पोटात गडबड असते, त्यांनी सकाळी रिकाम्या पोटी खजूर खावे. यातील फायबरमुळे डायजेशन आणि पोट साफ होण्याची प्रक्रिया सोपी होते. ज्यामुळे बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या दूर होते.

एका दिवसात किती खजूर खावे?
सगळ्या वयातील लोकांनी दिवसातून 2 खजूर खाण्यास सुरूवात करावी. वजन वाढवणाऱ्यांनी रोज 4 खजूर खावेत.

खजूर भिजवून का खावेत?
भिजवल्याने खजूरातील टॅनिन आणि फायटिक ॲसिड निघून जातं. भिजवलेले खजूर लवकर पचतात. जर तुम्हाला खजूराचे जास्त फायदे हवे असतील तर ते रात्री 8-10 तास भिजवून ठेवा.

( ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
 


सम्बन्धित सामग्री