मुंबई: आपले शरीर निरोगी राहण्यासाठी रोज सकाळ व्यायाम करणे महत्त्वाचे असते. मात्र काही लोकांनी त्यांच्या बिझी शेड्युलमधून व्यायाम करणे शक्य नसते. तर काही जण व्यायाम करण्यासाठी कंटाळा करतात. परंतु निरोगी शरीरासाठी दररोज व्यायाम करणे गरजेचे आहे. तरीही काही जणांना व्यायाम करायचा आहे. पण वेळ मिळत नाहीये. त्यामुळे अशा लोकांनी आपले काम करुन व्यायामासाठी कसा वेळ द्यावा, यासाठी 10 सोपे उपाय सांगणार आहोत. शक्य असल्यास नक्की करा.
जर तुमच्याकडे व्यायामासाठी वेळ नसेल, तर खालील उपाय नक्की ट्राय करा...
लिफ्टऐवजी जिना वापरा – ऑफिस किंवा घरात लिफ्ट न वापरता जिन्याने चढ-उतर करा, यामुळे तुमचे पाय आणि फुफ्फुसे सक्रिय राहतात.
जास्त वेळ बसू नका – दर 30- 45 मिनिटांनी उठून 2 मिनिटे चालणे, अंग ताणणे. यामुळे शरीराला हालचाल मिळते.
मोबाईलवर बोलताना फिरा – फोनवर बोलतानाही जागेवर न उभे राहता खोलीत फिरत राहा.
टीव्ही बघताना हलका व्यायाम करा – टीव्ही बघताना स्क्वॅट्स, पुल-अप्स, किंवा स्ट्रेचेस सहज करता येतात.
सकाळी 5 मिनिटांचा व्यायाम – दिवसाची सुरुवात फक्त 5 मिनिटांच्या सूर्यनमस्काराने करा. थोडं का होईना पण रोज करा.
हेही वाचा: लंगडा आंब्यांची 300 वर्षे जुनी गोष्ट तुम्हाला माहिती आहे का?
बाइक किंवा गाडीऐवजी चालत जा – जवळच्या ठिकाणी जाण्यासाठी चालणे निवडा. हा ही व्यायामच आहे.
कामाच्या वेळी ताठ बसा आणि श्वसन करा – योग्य आसन आणि श्वसनावर लक्ष देणे, मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
घरकामात सक्रिय व्हा – झाडू-पोछा, भांडी घासणे, बागकाम हे ही उत्कृष्ट शारीरिक श्रम आहे.
झोपण्याआधी 5 मिनिटे स्ट्रेचिंग – रात्री झोपण्यापूर्वी शरीर सैल करण्यासाठी स्ट्रेचेस करा.
ऑफिसमध्ये बसून ताण देणारे व्यायाम करा – मान, खांदे, मनगट, पाय यासाठी काही व्यायाम दररोज करा.